अडीच वर्षांच्या लेकीसोबत वडिलांचे अश्लील चाळे, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केला... पुढे काय घडलं?

मुंबई तक

• 05:52 PM • 16 Feb 2026

crime news : वडील आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करताना आईने रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या मुलीवर हैवानी कृत्य करण्यात आले ती मुलगी केवळ अडीच वर्षांची होती अशी माहिती समोर आली आहे. घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

crime news

crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वडील आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करताना आईने रंगेहाथ पकडले

point

आईने पुराव्यासाठी बनवला व्हिडिओ

Crime news : वडील आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करताना आईने रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ज्या मुलीवर हैवानी कृत्य करण्यात आले ती मुलगी केवळ अडीच वर्षांची होती अशी माहिती समोर आली आहे. घटनेनं परिसर हादरून गेला आहे, दरम्यान ही घटना दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील खोडा पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे वृत्त आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा :  जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन

नवऱ्याने अडीच वर्षाच्या लेकीचं केलं लैंगिक शोषण

मुलीच्या आईला काही काळापासून तिचा नवरा आलमवर संशय होता, तिला शंका होती की तो त्यांच्या निष्पाप मुलीसोबत चुकीचा प्रकार करत आहे. तिजच्या नवऱ्याचे हे हैवानी कृत्य उघडकीस आणण्यासाठी आई नवऱ्यावर सतत लक्ष ठेवून होती. अशातच वडील आलम मुलीवर अश्लील कृत्य करत असल्याचं पाहिलं आणि आईने शांतपणे व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ नराधम बापाविरुद्ध एक पुरावा बनला. 

आईने पुराव्यासाठी बनवला व्हिडिओ

संबंधित व्हिडिओ बनवल्यानंतर धाडसी आई तिच्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली, नंतर पोलिसांना तिने संपर्ण घटना सांगितली. पोलिसांनी कसलाही विलंब न करता आरोपीच्या मुसक्या आवळल्या, नंतर पीडितेला रुग्णालयात पाठवण्यात आले. 

हे ही वाचा :  ट्रक ड्रायव्हर नवऱ्यासोबत त्याचा दोस्त घरी यायचा, बायको प्रेमात पडली,...मोठं कांड केलं, प्रकरण ऐकून पोलीसही चक्रावले

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱी म्हणाले की, हा एक घृणास्पद गुन्हा आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.