खैरेंचा पहिल्यांदा सत्कार झाला अन् शिरसाटांचा इगो दुखावला : जलील, सावेंची मध्यस्थी

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काल औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे यावेळी नेमक्या काय घडामोडी घडणार? कोण-कोणामध्ये शाब्दिक चकमक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच वादाची पहिली ठिणगी पडली ती आमदार संजय शिरसाट आणि थेट पोलिसांमध्येच. यावेळी आमदार शिरसाट यांचा इगो चांगलाच दुखावला, आणि त्याला कारण ठरले शिवसेनेचे (ठाकरे […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:43 AM • 28 Aug 2022

follow google news

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काल औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे यावेळी नेमक्या काय घडामोडी घडणार? कोण-कोणामध्ये शाब्दिक चकमक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच वादाची पहिली ठिणगी पडली ती आमदार संजय शिरसाट आणि थेट पोलिसांमध्येच. यावेळी आमदार शिरसाट यांचा इगो चांगलाच दुखावला, आणि त्याला कारण ठरले शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी खासदार चंद्रकांत खैरे.

हे वाचलं का?

औरंगाबाद पोलीस आयुक्तलयाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिरसाट यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदिप जैस्वाल, माजी खासदार चंद्रकांत खैरे, पोलिस आयुक्त, सहायक आयुक्त असे सर्वजण उपस्थित होते.

साळवी-राऊतांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी : रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

याचवेळी सहाय्यक आयुक्तांनी सत्कारासाठी आमदार शिरसाट यांच्याआधी चंद्रकांत खैरे यांचे नाव पुकारले. सत्कारासाठी आपल्याआधी खैरे यांचे नाव घेतल्याने शिरसाट यांचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले. शिरसाट तडकाफडकी जागेवरून उठून निघाले. पण शेजारीच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात पकडत रोखले. शिरसाट रागात म्हणाले, प्रोटोकॉल वगैरे काही आहे की नाही? पण जलिल आणि मंत्री अतुल सावे यांनी त्यांना कसेबसे शांत केले.

शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?

त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी छातीवर हात ठेवत अधिकाऱ्यांना तत्काळ बदल करण्यास सांगितले आणि नंतर वातावरण शांत झाले. शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने यापूर्वी शिरसाटांची नाराजी दिसून आली आहे. विधिमंडळ अधिवेशनातही शिरसाट यांची यावरून खिल्ली उडवण्यात आली होती. त्यात सत्कारावेळीही आपल्याला योग्य मान मिळत नसल्याचा राग आता शिरसाटांच्या मनात आहे.

    follow whatsapp