Sanjeev palande : अनिल देशमुखांचे PA येणार तुरुंगाबाहेर, कोर्टात दिलासा

विद्या

• 08:26 AM • 25 Jan 2023

Sanjeev palande, personal assistant of Anil Deshmukh has been granted bail by Bombay high court in CBI case । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक (personal assistant) संजीव पलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे संजीव पलांडे यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयने पलांडे यांना सीबीआय प्रकरणात […]

Mumbaitak
follow google news

Sanjeev palande, personal assistant of Anil Deshmukh has been granted bail by Bombay high court in CBI case । राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक (personal assistant) संजीव पलांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे संजीव पलांडे यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयने पलांडे यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. (Sanjeev Palande gets bail by bombay High court in cbi case)

हे वाचलं का?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (25 जानेवारी) पलांडे यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे संजीव पलांडे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे.

संजीव पलांडे यांना ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आधीच जामीन मिळालेला आहे. त्यानंतर त्यांना आता सीबीआय प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात संजीव पलांडे यांना अटक करण्यात आली होती.

परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

अनिल देशमुखांच्या प्रकरणात संजीव पलांडे कसे अडकले?

अँटेलिया स्फोटक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक झाल्यानंतर मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता.

अनिल देशमुखांनी पोलिसांना मुंबईतील बार, पब मालकांकडून पैसे गोळा करायला सांगितले, असा आरोप परमबीर सिंह यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पैसे घेतल्याचंही पत्रात म्हटलेलं होतं. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100 कोटी खंडणीचं टार्गेट दिलं नव्हतं, पैसेही घेतले नाहीत-सचिन वाझे

तसेच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. याच प्रकरणात ईडीने अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक केली होती. अनिल देशमुख हे संजीव पलांडे यांच्या माध्यमातून पैसे घेत होते, असा आरोप आहे. याप्रकरणात संजीव पलांडे यांना दीड वर्षानंतर जामीन मिळाला आहे. पलांडे यांना ईडीच्या प्रकरणात आधीच जामीन मिळालेला असल्यानं तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

    follow whatsapp