भवानी घाटात 400 फूट खोल दरीत कोसळली कार; वयोवृद्ध आईसह मुलाचा जागेवरच मृत्यू

मुंबई तक

• 09:53 AM • 14 Dec 2021

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी मृतांची नावे आहेत. गजानन वावरे हे सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीत होते. सोसायटीची निवडणूक असल्याने ते मतदानासाठी सोमवारी (13 […]

MumbaiTak
Google CTA

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी मृतांची नावे आहेत.

हे वाचलं का?

गजानन वावरे हे सध्या नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीत होते. सोसायटीची निवडणूक असल्याने ते मतदानासाठी सोमवारी (13 डिसेंबर) थदाळे या आपल्या मूळगावी आले होते.

आज सकाळी गजानन वावरे हे त्यांच्या आईसह परत नाशिककडे जात होते. नाशिकच्या दिशेने जात असताना शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात त्यांची कार अपघातग्रस्त झाली.

मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी बसचा अपघात, तीन कामगारांचा मृत्यू

वावरे यांची कार भवानी घाटात 400 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये गजानन वावरे यांच्यासह त्यांची आई हिराबाई वावरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आलं.