बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरुन संतापलेल्या भावाने आपल्याच दाजींचा गळा आवळून आणि दगडाने ठेचून खून केला आहे. सातारा जिल्ह्यातील वाखाण परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
नितीन भालशंकर असं या प्रकरणातील मयत व्यक्तीचं नाव असून तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा रहिवासी आहे. पोलिसांनी नितीनचा मेव्हणा रवी कुडवेला या खुनाप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत नितीन भालशंकर हा वाखाण परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता.
मुंबई : १५ मिनीटांत दोघांची हत्या करणाऱ्या ‘सायको किलर’ ला अटक
नितीन आपल्या पत्नीला दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करायचा. नितीनच्या मेव्हण्याला म्हणजेच रवीला ही बाब समजल्यानंतर त्याने आपल्या भावोजींचा गळा आवळून आणि नंतर दगडाने ठेचून खून केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हिंगोली : बायको हरवल्याची तक्रार देणारा पतीच निघाला खुनी
ADVERTISEMENT
