Satyajeet Tambe: मी जर प्रदेशाध्यक्ष असतो, तर…; तांबेंचं मोठं विधान

मुंबई तक

04 Feb 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:04 AM)

satyajeet tambe latest news : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (nashik graduate constituency) विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) मौन सोडलं. गेल्या महिनाभरात झालेल्या काँग्रेसमधील घडामोडींबद्दल सत्यजित तांबेंनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी थेट नाना पटोले (Nana Patole) यांनाच लक्ष्य केलं आहे. सत्यजित तांबेंनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे चव्हाट्यावर आली. (satyajeet tambe press conference today ) […]

Mumbaitak
follow google news

satyajeet tambe latest news : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (nashik graduate constituency) विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबेंनी (Satyajeet Tambe) मौन सोडलं. गेल्या महिनाभरात झालेल्या काँग्रेसमधील घडामोडींबद्दल सत्यजित तांबेंनी त्यांची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी थेट नाना पटोले (Nana Patole) यांनाच लक्ष्य केलं आहे. सत्यजित तांबेंनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे चव्हाट्यावर आली. (satyajeet tambe press conference today )

हे वाचलं का?

सत्यजित तांबे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक खुलासे केले. तांबे म्हणाले, “उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला पहिला फोन आला, तो प्रभारी एच.के.पाटील यांचा आला. त्यांनी मला विचारलं की, काय प्रॉब्लेम झाला. मी त्यांना सगळं सांगितलं आणि आपण (काँग्रेस) मला पाठिंबा जाहीर करावा. ते म्हणाले ठिक आहे. मी त्यांना म्हणालो की, 16 तारखेला माघार आहे. त्यानंतर पाठिंबा जाहीर करा”, असं त्यांनी सांगितलं.

“मी महाविकास आघाडीतील सगळ्या घटकांशी चर्चा केली. मी संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. मी शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला, ते भेटले नाही. मी अजित पवारांनाही भेटण्याचा प्रयत्न केला. भेट झाली नाही, पण मी हा विषय त्यांच्या कानावर घातला. सुप्रिया सुळेंच्या कानावरही हा विषय घातला”, असं सत्यजित तांबे म्हणाले.

सत्यजित तांबेंचा खळबळजनक गौप्यस्फोट! नाना पटोलेंचं प्रदेशाध्यपद धोक्यात?

Satyajeet Tambe : “काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी दिल्लीत पत्र पाठवलं”

“माझा प्रामाणिक इच्छा होती की, मविआने मला तातडीने पाठिंबा द्यावा. त्यानंतर आम्ही दिल्लीतल्या नेत्यांच्या संपर्कात होतो. दिल्लीतून मला असं सांगण्यात आलं की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी म्हटलं ठिक आहे. मी पत्र पाठवलं. त्यांनी मला पत्रात काही शब्द टाकायला सांगितलं”, असंही तांबे यांनी यावेळी सांगितलं.

“ते मला म्हणाले तुला जाहीर माफी मागावी लागेल. मी म्हटलं माझी काहीही चूक झालेली नाही. ते म्हणाले, तरी पण मागावी लागेल. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी एच.के. पाटलांना पत्र लिहिलं. माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही बोलणं झालं होतं”, अशी माहिती यावेळी तांबे यांनी दिली.

मी माफी मागायला तयार असताना, प्रदेशाध्यक्ष… – सत्यजित तांबे काय म्हणाले?

“16 की 17 तारखेला मी नाना पटोलेंना फोनही केला होती की, सगळं सोडून द्या आणि मला पाठिंबा द्या. मी काँग्रेसचा आहे आणि माझ्या पाठिशी उभे रहा. एका बाजूला मी दिल्लीच्या नेतृत्वाशी बोलतोय. दिल्लीवाले माझ्याकडून लेखी पत्र मागत आहेत. दिल्लीवाले मला माफी मागायला सांगताहेत. मी तेही करायला तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रदेशाध्यक्ष मात्र आम्ही अमूक उमेदवाराला पाठिंबा देणार, सत्यजित तांबेंनी आम्हाला फसवलं. तांबेंनी धोका दिला. ज्या लोकांना थोरात तांबे परिवार माहिती आहे. ते लोक कधीच विश्वास ठेवू शकत नाही की हा परिवार कुणाला फसवू शकतो”, असं म्हणत सत्यजित तांबेंनी नाना पटोलेंच्या आरोपांना उत्तर दिलं.

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे देसाईंचं आव्हान स्वीकारणार का?

“आमच्यावर फसवल्याचं, धोका दिल्याचे आरोप केले गेले. अंधारात ठेवलं. मी पत्र दिल्यानंतर दोन तासांनी मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एका बाजूला दिल्लीचं नेतृत्व माझ्याशी बोलत असताना प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाच्या डोक्यात दुसरीच चाल सुरू होती”, असं म्हणत सत्यजित तांबेंनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केला.

हे सगळं हेतूपूर्वक केलं- सत्यजित तांबे

“एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात. नफरत छोडो, भारत जोडो म्हणतात. प्रेमाने लोक जोडा म्हणतात आणि या राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी, हेतूपूर्वक हा सगळा प्रकार केला, असं माझं स्पष्ट मत आहे”, अशी भूमिका सत्यजित तांबे यांनी मांडली.

“खासगी बैठकात कॉल्सवर जे बोललं गेलं. त्याच्या रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. माझ्या पक्षाची प्रतिमा अजून मलिन होऊ नये म्हणून मी कुठलीच गोष्ट करत नाहीयेत”, असं विधानही नाना पटोले यांनी केलं.

Maharashtra Congress : ‘सत्यजित तांबे हे आमचेच’; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा दावा

“बाळासाहेब थोरातांना कसं अडचणीत आणता येईल, याची स्टोरी…”

“मला उमेदवारी मिळू नये. बाळासाहेब थोरातांना कसं अडचणीत आणता येईल, याची ही स्टोरी तयार करण्यात आली. त्याचाच हा भाग होता. पक्षाने माझ्या वडिलांना पक्षाने दोन मिनिटांत निलंबित केलं. काहीही समजून न घेता कारवाई केली. मला हे माध्यमांपर्यंत जाऊ द्यायचं नव्हतं, पण मागच्या 15 दिवसांत ज्या प्रकारची विधानं झाली. त्यामुळे मला हे बोलावं लागतंय”, असं सत्यजित तांबे म्हणाले.

मास्टरमाईंड कोण? सत्यजित तांबे म्हणाले…

‘तुम्ही म्हणालात की, हे सगळं स्क्रिप्टेड होतं आणि मला पक्षाच्या बाहेर ढकललं जात होतं. हे सगळं कोण करत होतं, याचा मास्टरमाईंड कोण होता, त्याचं नाव सांगाल का?’, या प्रश्नावर तांबे म्हणाले, “तुम्हाला मास्टरमाईंड कळाला नाही का? मी का नाव घ्यायचं. बाळासाहेब थोरातांचं पक्षातंर्गत वाढत चाललेलं राजकारण दाबण्यासाठी आणि मला उमेदवारी मिळू नये म्हणून हे षडयंत्र होतं.”

“मला त्यांनी सहा वर्षांसाठी निलंबित केलं. एखाद्याला जर माहितीये की, मी निवडून येणारा उमेदवार आहे. मी जर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असतो ना, तर मी एका मिनिटात सत्यजित तांबेला पाठिंबा देऊन टाकला असता आणि माझा शिक्का लावून टाकला असता”, असं म्हणत तांबेंनी नाना पटोलेंना लक्ष्य केलं.

    follow whatsapp