नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून NIA मार्फत चौकशी करावी-चंद्रकांत पाटील

मुंबई तक

• 09:58 AM • 11 Nov 2021

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत […]

Mumbaitak
follow google news

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि एनआयएने ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बोर्नव्हिटा पिण्याची गरज आहे. असा टोला संजय राऊत आणि नवाब मालिक यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

हे वाचलं का?

नवाब मलिक यांनी स्वतःहूनच मान्य केलं आहे की ज्या आरोपींना टाडा लागणार होता त्यांच्याकडून जमीन कवडीमोल दराने खरेदी केली आहे. टाडामध्ये ज्या आरोपींची जमीन जप्त होणार होती ती जमीन नवाब मलिकांनी घेतली आहे. नवाब मलिकांनी हा देशद्रोह केला आहे. ओरा कमिशनचा रिपोर्ट समोर आणा त्यातून समजू शकेल काय काय घडलं आहे? टॉपचा नेताच जर दाऊदशी संबंधित आहे तर बिचारे मलिक तरी काय करणार? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कुणासोबत फोटो काढलेले दाखवत असतील तर त्यात काय विशेष तुमचेही फोटो अनेकांसोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावरून फडणवीसांनी सरळ अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय आरोप केले होते?

मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. असा आरोप आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला

नवाब मलिकांनी काय उत्तर दिलं?

आम्ही दीड लाख फूट जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी आरोप केला. खोटे भाडेकरु ठेवल्याचा आरोप केला. त्या दीड लाख फूट जमिनीची पाहणी करा. त्या जागेवर शेख मदिनातुल्ल अमान हाऊसिंग सोसायटी आहे.1984 मध्ये तिथ इमारत बांधण्यात आली. ती मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना विकासाचे अधिकार देऊन 140 लोकांना घरं दिली. त्याच्या मागे जमीन आहे त्यावर झोपडी आहे. तिथं जमीन आहे तिथं सॉलिडस कंपनीकडं जमीन आहे.

गेल्या 30 वर्षांपासून ती जमीन आमच्याकडे आहे. 1996 मध्ये भाजप आणि शिवसेना पार्टीची सत्ता होती. 9 नोव्हेंबरमध्ये नवाब मलिक यांनी शिवसेना भाजपकडून पोटनिवडणूक विजयी झाले होते. त्याच गोवावाली बील्डिंगच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला होता. आम्ही भाडेकरु होते. मुनिरा पटेल यांनी आमच्याशी संपर्क करुन आमच्याकडे असलेल्या जागेचा पूर्ण ताबा घ्या असं म्हटलं. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली. सलीम पटेल याला मुनिरा पटेल यांनी पॉवर ऑफ अ‌ॅटर्नी केल होतं. सरकारी दरानुसार आम्ही स्टॅम्प ड्युटी भरली होती. सरकारी कागदपत्रात त्याचा उल्लेख आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp