शिर्डी : साईबाबा मंदिर ट्रस्टला तब्बल 175 कोटी रूपयांच्या आयकरातून सूट

मुंबई तक

• 04:02 AM • 26 Nov 2022

शिर्डी : आयकर अर्थात प्राप्तिकर विभागाने अखेर शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्र्स्टला धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्टची मान्यता दिली आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टला तब्बल १७५ कोटींचा आयकर भरण्यातून सूट देण्यात आली आहे. या निर्णयानंतर संस्थानचा मोठ्या प्रमाणावर पैसा वाचणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या प्रयत्नातून संस्थानने ही कायदेशीर लढाई जिंकली आहे. आयकर विभागाने […]

Mumbaitak
follow google news

शिर्डी : आयकर अर्थात प्राप्तिकर विभागाने अखेर शिर्डी येथील साईबाबा मंदिर ट्र्स्टला धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्टची मान्यता दिली आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टला तब्बल १७५ कोटींचा आयकर भरण्यातून सूट देण्यात आली आहे. या निर्णयानंतर संस्थानचा मोठ्या प्रमाणावर पैसा वाचणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या प्रयत्नातून संस्थानने ही कायदेशीर लढाई जिंकली आहे.

हे वाचलं का?

आयकर विभागाने सन २०१५-१६ चे कर निर्धारण करताना ‘साईबाबा संस्‍थान’ हा धार्मिक ट्रस्‍ट नसुन धर्मादाय ट्रस्‍ट गृहीत धरला होता. त्यामुळे दक्षिणापेटीत आलेल्‍या दानावरती ३० टक्‍के आयकर आकारणी करुन १८३ कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. मात्र आयकर विभागाने मागील २ वर्षांच्या दक्षिणा पेटीतील दानावर आयकर आकारणी केली नव्‍हती.

हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर निर्णयास अनुसरुन मागील २ वर्षाच्‍या दक्षिणापेटील दानावर देखील आयकर आकारणीचा निर्णय घेतला आणि संस्‍थानला कर आकारणीच्‍या नोटीसा देण्यात आल्या. त्यानंतर संस्‍थानमार्फत आधी उच्‍च न्‍यायालय आणि नंतर सर्वोच्‍च न्‍यायलयात रिट अर्ज दाखल करण्‍यात आले होते. उच्‍च न्‍यायलय आणि सर्वोच्‍च न्‍यायालयानेही आयकर अपीलामध्‍ये कर निश्चित होईपर्यंत देय करास स्‍थगिती आदेश दिला होता.

या दरम्यानच्या काळात संस्‍थानमार्फत आयकर अपिल दाखल करण्‍यात आले आणि आयकर विभागाने अंतिमतः साईबाबा संस्‍थानला धार्मिक आणि धर्मदाय ट्रस्‍ट असल्‍याचे मान्‍य करत दक्षिणापेटीतील दानावर आकारणी करण्‍यात आलेल्‍या करात सुट दिली आहे. अशा प्रकारे मागील तीन वर्षात आकारणी करण्‍यात आलेल्‍या १७५ कोटी रुपये आयकरात श्री साईबाबा संस्‍थानला सुट मिळाली आहे. साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयामध्‍ये दिल्‍लीचे वरिष्‍ठ वकील सीए श्री.एस.गणेश यांनी संस्‍थानची बाजू मांडली.

    follow whatsapp