राजकारणात शाब्दिक द्वंद्वाची पातळी खालावली?दीपाली सय्यद यांची फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात पक्षांमध्ये होणाऱ्या शाब्दिक द्वंद्वाची पातळी खालावल्याची चर्चा रंगत होती. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत टीकास्त्र सोडलं आहे. […]

Mumbai Tak

मुंबई तक

16 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:56 AM)

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारणात पक्षांमध्ये होणाऱ्या शाब्दिक द्वंद्वाची पातळी खालावल्याची चर्चा रंगत होती. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत टीकास्त्र सोडलं आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. या टीकेला फडणवीसांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. परंतू यादरम्यान फडणवीसांवर टीका करताना दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं आहे.

उद्घव ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीसांच्या वजनावरुन त्यांची खिल्ली उडवली होती. ज्याला उत्तर देताना फडणवीसांनी मी बाबरीवर पाय ठेवला असला तर बाबरी पडली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांना मला सांगायचं आहे की बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ होतं. आता मी १०२ वजनाचा आहे. मुख्यमंत्र्यांना सामान्य माणसाची भाषा कळत नाही त्यांना FSI ची भाषा कळते अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

परंतू दिपाली सय्यदने केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा सेना आणि भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

    follow whatsapp