साताऱ्यात शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढणार, शंभुराज देसाईंचा राष्ट्रवादीला इशारा

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हात मिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकात शिवसेना स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन […]

maratha reservation manoj jarange patil shambhuraj desai criticized chhagan bhujbal on kunabi certificate

maratha reservation manoj jarange patil shambhuraj desai criticized chhagan bhujbal on kunabi certificate

मुंबई तक

• 10:54 AM • 30 Nov 2021

follow google news

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हात मिळवणी केली. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूकात शिवसेना स्वबळावर लढणार असून, येथेही आघाडी धर्म पाळायचा का नाही, हे आता आम्ही ठरवू, असा इशारा शिवसेनेचे नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

हे वाचलं का?

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : रांजणे छोटे कार्यकर्ते, बोलवता धनी वेगळा – शशिकांत शिंदेंची टीका

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी आज शासकिय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार महेश शिंदे, माजी आमदार सदाशिव सपकाळ, संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, चंद्रकांत जाधव, नंदकुमार घाडगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सातारा: ‘ओ शेsssठ.. तुम्ही नादच केलाय थेट’, शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्याच नेत्याचा जबरा डान्स

जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म पाळला नाही. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळायचा का नाही, ते आता ठरवू. जिल्हा बॅंकेत शिवसेनेला चार जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आमची होती. आम्ही स्वत: च्या बळावर दोन जागा निवडून आणल्या आहेत, असं बानगुडे म्हणाले.

कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदेंनीही यावेळी शशिकांत शिंदेला टोला लगावला आहे. “जिल्हा बॅंकेत कोरेगाव आणि माणचे असे दोन संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी माझ्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सुनील खत्री हेही आमचेच आहेत. कोरेगावात भावकी ही गाव व तालुका पातळीवर असेल. बाहेरच्या लोकांसाठी भावकी नाही”, असं महेश शिंदे म्हणाले.

२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं

    follow whatsapp