धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर पेणमध्ये सामुहीक बलात्कार, सात जण अटकेत

मुंबई तक

• 04:07 AM • 30 Jan 2022

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वाशी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आरोपी पीडित मुलीला जिवे मारायची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करायचे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून ३ आरोपी फरार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी […]

Mumbai Tak
Google CTA

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वाशी परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आरोपी पीडित मुलीला जिवे मारायची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करायचे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून ३ आरोपी फरार आहेत.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाशी परिसरात आपल्या पालकांसोबत रहायची. याच भागात राहणारे काही तरुण केल्या काही दिवसांपासून या तरुणीला सतत धमकवायचे. सर्वात आधी दोन मित्रांनी या तरुणीवर शारिरिक अत्याचार केले. याबद्दलची माहिती जेव्हा त्यांच्या इतर मित्रांना समजली, तेव्हा त्या नराधमांनीही परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं.

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने ‘असा’ काढला काटा

आरोपींनी पीडित मुलीला जिवे मारायची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने सामुहीक बलात्कार केला. पीडित मुलीने या घटनेची माहिती पालकांना दिली असता त्यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ७ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच घटनेचं गांभीर्य पाहता या घटनेत आणखी काही तरुण सहभागी असल्याचा पोलिसांना अंदाज आहे. या दृष्टीकोनातून वडखळ पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग