धक्कादायक.. पुण्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा काढला काटा

मुंबई तक

• 06:59 AM • 04 Apr 2022

पुणे: पुण्याच्या कात्रज परिसरात पत्नीने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह लोखंडी पाइपला लटकवून पतीने आत्महत्या केली असा बनाव देखील रचला. प्रकाश किसन जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी शालन जाधव तर मुलगा हा अल्पवयीन आहे. प्रकाश जाधव […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुण्याच्या कात्रज परिसरात पत्नीने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह लोखंडी पाइपला लटकवून पतीने आत्महत्या केली असा बनाव देखील रचला.

हे वाचलं का?

प्रकाश किसन जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी शालन जाधव तर मुलगा हा अल्पवयीन आहे. प्रकाश जाधव हे त्यांच्या पत्नीवर नेहमीच संशय घेत होते. त्यामुळे या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती.

घटनेच्या दिवशी ही अशीच भांडणे विकोपाला गेल्याने पत्नी आपल्या मुलाच्या साथीने पतीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत प्रकाश जाधवचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या शालन जाधव हिने पतीचा मृतदेह पाइपला लटकवला.

दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांना प्रकाश जाधव नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकाश जाधवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला.

तोवर ही आत्महत्या असल्याचाच बनाव शालन जाधव यांनी रचला होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा समोर आला तेव्हा या प्रकरणातील सत्य समोर आलं. यावेळी रिपोर्टमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, प्रकाश जाधवचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाला आहे.

अखेर सखोल तपास केल्यानंतर आणि शालन जाधवची चौकशी केल्यानंतर पोलिसांना गुन्ह्याची उकल झाली. ज्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पत्नी शालन जाधव आणि अल्पवयीन मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी महिलेला अटक केली आहे. तर मुलगा अल्पवयीन असल्याने त्याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

पुण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या

विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या सोबतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव; ४८ तासांत आरोपी अटकेत

काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका मोटारसायकचा अपघात झाला होता, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले. परंतू पोलीस तपासात हा अपघात नसून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृत चालक रामेश्वर निषादच्या पत्नीने विवाहबाह्य संबंधातून आपल्या प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

रामेश्वर निषादच्या अपघाताची बातमी त्याचा मित्र सुरज सोनकरने पोलिसांना दिली होती. बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पुलावरुन जात असताना समोरुन येणाऱ्या गाडीचा प्रकाश डोळ्यात गेल्यामुळे राजेश्वरचं गाडीवरचं संतुलन बिघडलं आणि तो गाडीसकट पुलाखाली पडल्याची माहिती सुरजने पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरुवात केल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. चौकशीदरम्यान हा अपघात घडण्याआधी सुरज आणि रामेश्वर यांनी एका ढाब्यावर जेवण करुन दारु प्यायल्याचं पोलिसांना कळलं. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना सुरजची भूमिका संशयास्पद आढळून आली. रामेश्वरसोबत बसलेला असताना सुरज न जेवता वारंवार कोणाशीतरी फोनवर बोलायला उठून जात होता. यानंतर पोलिसांनी सुरजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याने घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली होती.

सुरजचे मृत रामेश्वरच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यातूनच रामेश्वरची हत्या करुन तो अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. या कामासाठी सुरजने आपला मित्र अभिजीत पांडेला १५ हजार रुपये देत हत्येच्या कटात सहभागी करुन घेतलं. सुरज, अभिजीत आणि मृत रामेश्वरच्या पत्नीने एकत्र बसून हत्येचा कट रचला. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे रामेश्वरला धाब्यावर नेऊन जेवण आणि दारु प्यायल्यानंतर वर्धा नदीत त्याचं तोंड बुडवून हत्या करण्यात आली होती.

    follow whatsapp