सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेची निवडणुकीत कोणी मारली बाजी कोणाचा पराभव? संपूर्ण निकाल एका क्लिकवर

मुंबई तक

• 08:42 AM • 31 Dec 2021

भारत केसरकर, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर या निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार विजय मिळवणार की नाही याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. ही निवडणूक राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. जी त्यांनी एकहाती जिंकली असल्याचं आता निकालानंतर स्पष्ट झालं आहे. जिल्हा बँकेच्या […]

Mumbaitak
follow google news

भारत केसरकर, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर या निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार विजय मिळवणार की नाही याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. ही निवडणूक राणे कुटुंबीयांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. जी त्यांनी एकहाती जिंकली असल्याचं आता निकालानंतर स्पष्ट झालं आहे.

हे वाचलं का?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. यावेळी एकून 19 जागांपैकी भाजपने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला आठ जागांवरच विजय मिळवता आला आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असलेले सतीश सावंत यांना मात्र पराभव सहन कराना लागला आहे. तर दुसरीकडे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभव धक्का बसला आहे. जाणून घ्या या निवडणुकीचा संपूर्ण निकाल

पाहा संपूर्ण निकाल:

भाजप वि. महाविकास आघाडी

  1. राजन कृष्णा तेली 63 विरुद्ध सुशांत श्रीधर नाईक 78 (विजयी)

  2. अतुल सुधाकर काळसेकर 44 (विजयी) विरुद्ध सुरेश यशवंत दळवी 26

  3. गजानन सुमंत गावडे 110 (विजयी) विरुद्ध लक्ष्मण आनंद आंगणे 85

  4. महेश रमेश सारंग 33 (विजयी) विरुद्ध मधुसुदन केशव गावडे 27

  5. संदिप उर्फ बाबा मधुकर परब 68 (विजयी ) विरुद्ध विनोद रामचंद्र मर्गज 54

  6. समीर रमाकांत सावंत 110 (विजयी ) विरुद्ध विकास भालचंद्र सावंत 85

  7. मनीष प्रकाश दळवी 13 (विजयी ) विरुद्ध विलास प्रभाकर गावडे 8

  8. गुरूनाथ शंकर पेडणेकर 16 विरुद्ध विद्याधर रविंद्रनाथ परब 17 (विजयी)

  9. प्रकाश सखाराम गवस 5 विरुद्ध गणपत दत्ताराम देसाई 7 (विजयी)

  10. विठ्ठल दत्ताराम देसाई (विजयी) विरुद्ध सतीश जगन्नाथ सावंत

  11. प्रकाश जगन्नाथ मोर्ये 15 विरुद्ध विद्याप्रसाद दयानंद बांदेकर 20 (विजयी)

  12. प्रकाश विष्णू बोडस 19 (विजयी) विरुद्ध अविनाश मनोहर माणगांवकर 17

  13. कमलाकांत उर्फ बाळू धर्माजी कुबल 11 विरुद्ध व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस 19 (विजयी)

  14. दिलीप मोहन रावराणे 11 (विजयी) विरुद्ध दिगंबर श्रीधर पाटील 9

  15. अस्मिता दत्तात्रय बांदेकर 459 (विजयी) विरुद्ध अनारोजीन जॉन लोबो 457

  16. प्रज्ञा प्रदिप ठवण 480 विरुद्ध निता रणजितसिंग राणे 503 (विजयी)

  17. सुरेश ज्ञानदेव चौकेकर 458 विरुद्ध आत्माराम सोमा ओटवणेकर 506 (विजयी)

  18. रविंद्र मनोहर मडगांवकर 484 ( विजयी ) विरुद्ध मनिष मधुकर पारकर 481

  19. गुलाबराव शांताराम चव्हाण 451 विरुद्ध मेघनाद गणपत धुरी 517 (विजयी)

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवार

  1. सुशांत श्रीधर नाईक

  2. अतुल सुधाकर काळसेकर

  3. गजानन सुमंत गावडे

  4. महेश रमेश सारंग

  5. संदिप उर्फ बाबा मधुकर परब

  6. समीर रमाकांत सावंत

  7. मनीष प्रकाश दळवी

  8. विद्याधर रविंद्रनाथ परब

  9. गणपत दत्ताराम देसाई

  10. विठ्ठल दत्ताराम देसाई

  11. विद्याप्रसाद दयानंद बांदेकर

  12. प्रकाश विष्णू बोडस

  13. व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस

  14. दिलीप मोहन रावराणे

  15. अस्मिता दत्तात्रय बांदेकर

  16. निता रणजितसिंग राणे

  17. आत्माराम सोमा ओटवणेकर

  18. रविंद्र मनोहर मडगांवकर

  19. मेघनाद गणपत धुरी

सिंधुदुर्ग: नितेश राणे 2 दिवसांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह, शेअर केला फोटो; म्हणतात ‘गाडलाच..’

पराभूत उमेदवार महाविकास आघाडी

  • सतीश सावंत

  • सुरेश दळवी

  • एम के गावडे

  • विकास सावंत

  • अविनाश माणगाकर

  • दिगंबर पाटील

  • विनोद मर्गज

  • विलास गावडे

  • अनारोजीन लोबो

  • मनीष पारकर

  • लक्ष्मण (बाबा आंगणे)

भाजपचे पराभूत उमेदवार

  • राजन तेली

  • प्रकाश गवस

  • प्रकाश मोर्ये

  • गुरुनाथ पेडणेकर

  • गुलाबराव चव्हाण

  • सुरेश चौकेकर

  • अस्मिता बांदेकर

  • कमलकांत कुबल

    follow whatsapp