अहमनदगरमध्ये शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू, सगळं गाव हळहळलं

मुंबई तक

08 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:08 AM)

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावांतर्गत असलेल्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार ता.८ मे रोजी सकाळी घडली आहे या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.जयश्री बबन शिंदे ( वय- २१) आणि आयुष बबन शिंदे (वय ७) अशी या भावंडांची नावं आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी […]

Mumbaitak
follow google news

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावांतर्गत असलेल्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार ता.८ मे रोजी सकाळी घडली आहे या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.जयश्री बबन शिंदे ( वय- २१) आणि आयुष बबन शिंदे (वय ७) अशी या भावंडांची नावं आहेत.

हे वाचलं का?

याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहात आहेत. रविवारी सकाळी मुलगी जयश्री आणि मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ धुणं धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी जय असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्रीने शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघंही शेततळ्यात बुडाले. याच घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला.

कुलर ठरला किलर? नाशिकमध्ये आजोबा आणि नातू यांचा मृत्यू

जयश्री आणि आयुष हे दोघे बहीण-भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता कारण या दोघांचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहेत. बहीण- भावाच्या मृत्यूमुळे पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.

जयश्री आणि आयुष या दोघा बहीण- भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता त्यामुळे त्यांच्या मृत्यूने मोधळवाडी, पिंपळगाव देपा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

    follow whatsapp