ओमिक्रोन व्हेरिएंट: ‘या’ जिल्ह्यात नव्याने निर्बंध लागू, कोरोना संकटाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात धास्ती

मुंबई तक

• 09:18 AM • 29 Nov 2021

विजयकुमार बाबर, सोलापूर कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रोन’ने आता अवघ्या महाराष्ट्राची धास्ती वाढली आहे. दुसरी लाट येऊ गेल्यानंतर आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच ओमिक्रोन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, हे संकट लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून सर्व कार्यक्रमावर कडक बंधने घालण्यात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे […]

Mumbaitak
follow google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

हे वाचलं का?

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रोन’ने आता अवघ्या महाराष्ट्राची धास्ती वाढली आहे. दुसरी लाट येऊ गेल्यानंतर आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. अशातच ओमिक्रोन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. दरम्यान, हे संकट लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली असून सर्व कार्यक्रमावर कडक बंधने घालण्यात आली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अद्याप 10 लाख लोकांचे लसीकरण बाकी असून लस घेणाऱ्या नागरिकांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

देशासमोर नव्याने उभे ठाकलेल्या ओमीक्रोन व्हेरिएंट संकटाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. जिल्हातील सर्व कार्यक्रमांला निर्बंध घालून दिले आहेत. तसेच दोन्ही लसीकरण पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाच सरकारी कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

जाणून घ्या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत

व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत.

यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.

डोंबिवलीकरांना ओमिक्रॉनचा धसका : पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती अफ्रिकेतून डोंबिवली गाठेपर्यंत काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.

ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचे अनेक म्युटेशन आढळून आले आहेत. त्यामुळे या व्हेरिएंटचा संसर्गांचा वेग प्रचंड असल्याचं शास्त्रज्ञांकडून सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल चार पटीने वाढ झाली असून, ही वाढ B.1.1.529 चा आढळून आल्यानंतर झाल्याचं दिसून आलं आहे.

    follow whatsapp