Dahi handi 2022 Live : गोविंदा रे गोपाळा! येथे पहा दहीहंड्यांचा थरार…

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा म्हणजे जन्माष्टमी पार पाडल्यानंतर आज महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होतोय. झरझर उंच थर लावून लाखोंची बक्षीस पटकावण्यासाठी गोविंदामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरण आणि आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध ठिकाणी दहीहंड्यांच्या उत्सवाचा आवाजही वाढला आहे. राज्यात सर्वत्र गोविंदा रे गोपाळा… गोविंदा आला रे […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 06:40 AM • 19 Aug 2022

follow google news

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा म्हणजे जन्माष्टमी पार पाडल्यानंतर आज महाराष्ट्रासह देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होतोय. झरझर उंच थर लावून लाखोंची बक्षीस पटकावण्यासाठी गोविंदामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे.

हे वाचलं का?

राज्यातील बदललेली राजकीय समीकरण आणि आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध ठिकाणी दहीहंड्यांच्या उत्सवाचा आवाजही वाढला आहे. राज्यात सर्वत्र गोविंदा रे गोपाळा… गोविंदा आला रे आला… अशा घोषणांचा निनाद सुरू असून, सगळीकडे भारावून टाकणार वातावरण आहे.

Dahi Handi 2022 : What’s App, Facebook वर दहीहंडी निमित्त द्या खास शुभेच्छा!

गोकुळाष्टमी आणि दहीहंडी का साजरी केली जाते?

श्रावण वद्य अष्टमीसच्या मध्यरात्रीस श्रीकृष्णाचा जन्म झाला. हाच दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी वा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. देवकीच्या पोटी कृष्णाचा जन्म झाला. त्यानंतर वासुदेवानं कंसाच्या भीतीने रात्रीतूनच श्रीकृष्णाला गुप्तपणे गोकुळात यशोदेकडे पोहोचविलं.

गोकुळात श्रीकृष्ण जन्मामुळे सगळ्यांना आनंद झाला. याच दिवशी उपवास करतात. रात्री मंदिरांमध्ये जन्मोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने कथा कीर्तनेही आयोजित केली जातात.

सरकारी नोकरी, आर्थिक सहाय्य…; गोविंदा पथकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

वैष्णव संप्रदायात हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. गोकुळ, वृंदावन, मथुरा, पुरी, द्वारका या ठिकाणी गोकुळाष्टमीचा उत्साह डोळ्यात साठवून ठेवावा असा असतो. वृंदावनात या निमित्ताने ‘दोलोत्सव’ साजरा होतो. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दहीकाला होतो आणि दहीहंड्या फोडतात. तर जन्माष्टमी निमित्ताने काही ठिकाणी गोपालकालाही होतो.

    follow whatsapp