शिंदे-फडणवीस मंत्रीमंडळात सुधीर मुनगंटीवार झाले कॅबिनेट मंत्री?, कोनशिलेवरील उल्लेखाने गोंधळ

मुंबई तक

• 12:23 PM • 30 Jul 2022

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. तिथूनच आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री होऊन 31 दिवस झाले आहेत. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. पण त्याचवेळी राज्यपालांच्या उपस्थितीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून आले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकरणाने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. तिथूनच आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री होऊन 31 दिवस झाले आहेत. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. पण त्याचवेळी राज्यपालांच्या उपस्थितीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून आले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकरणाने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे. नेमका हा प्रकार काय ते जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते अनावरण

मुंबईच्या अंधेरी भागात शुक्रवारी 29 जुलैला एका चौकाचा नामकरण सोहळा झाला. अंधेरीच्या जेपी रोड भागात दाऊद बाग जंक्शन इथल्या चौकाचं श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी असं नामकरण करण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याचवेळी भाजप समर्थक खासदार नवनीत राणा, भाजप आमदार नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर, अपक्ष आमदार रवी राणा यांचीही उपस्थिती होती. याच सगळ्यांच्या साक्षीनं राज्यपाल कोश्यारींनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं. यावरून राज्यपालांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं. पण याच कार्यक्रमात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे.

मुनगंटीवारांचा उल्लेख कॅबिनेट मंत्री म्हणून…कसा?

मंत्रिमंडळ विस्ताराची निव्वळ चर्चाच सुरू असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं आहे. त्याचं झालं असं, की या कार्यक्रमासाठी जी कोनशिला तयार करण्यात आली, त्यावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपालांसोबतच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंही नाव आहे. तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या नावाचाही उल्लेख आहे. पण मुनगंटीवारांच्या नावासोबत कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र सरकार असाही उल्लेख करण्यात आला आहे. आणि स्वतः राज्यपालांनी या कोनशिलेचं अनावरण केलं आहे. आणि ही कोनशिला इंग्रजीमध्ये आहे. म्हणजे राज्यपालांना मराठीतलं नाव वाचण्याचीही अडचण इथे नाही. त्यामुळेच राज्यपालांनी गुप्तपणे मुनगंटीवारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे का? असा प्रश्न लोक विचारत आहेत.

मुनगंटीवार फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री होते. म्हणजेच माजी मंत्री आहे. पण कोनशिलेवर ज्या पदाचा उल्लेख केलाय याचाच अर्थ मुनगंटीवारांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झालाय, असा निघतो किंवा मुनगंटीवारांचं कॅबिनेट मंत्रीपद ही अनावधानानं झालेली चूक आहे, हे मात्र सध्या कळायला मार्ग नाही.

    follow whatsapp