TET Exam Scam : माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह दोघांना अटक; बीडमधील एकाला बेड्या

मुंबई तक

• 04:58 AM • 21 Dec 2021

राज्यात आरोग्य भरती आणि म्हाडा भरती पेपरफुटीचं प्रकरण गाजत असून, आता टीईटी परीक्षा घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन गुण वाढवल्याच्या घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेला अटक केली असून, आता याच प्रकरणात माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीकडून […]

Mumbaitak
follow google news

राज्यात आरोग्य भरती आणि म्हाडा भरती पेपरफुटीचं प्रकरण गाजत असून, आता टीईटी परीक्षा घोटाळ्याने खळबळ उडवली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन गुण वाढवल्याच्या घोटाळ्याचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेला अटक केली असून, आता याच प्रकरणात माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात आली, त्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

म्हाडा परीक्षेचा पेपर फोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सायबर सेलला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून दोन एजंटला अटक केली होती. त्यांच्याच गाडीत पोलिसांना जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख आढळून आले होते. त्यांच्याकडे प्रश्नपत्रिकेचे सेट आणि परीक्षेशी संबंधित साहित्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे यांचा यात सहभाग असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नीचा डाव फसला! लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं

सुखदेव डेरे यांना अटक करण्याचं कारण काय?

सुखदेव डेरे हे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या औरंगाबाद विभागाचे माजी अध्यक्ष आहेत. 2017 मध्ये जी. ए. सॉफ्टवेअर या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट मिळालं तेव्हा सुखदेव डेरे हे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीला टीईटी परीक्षेचं कंत्राट मिळाल्यापासूनच परीक्षांमध्ये गैरप्रकार सुरू होता, अशी माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रमुख अधिकारी अश्विन कुमार याला बंगळुरूमधून अटक केली आहे. जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीकडे 2017 ते 2020 या काळात परीक्षा घेण्याचं कंत्राट होतं.

सेवेत असतानाच डेरेंवर झाली होती निलंबनाची कारवाई

शिक्षण उपसंचालक असताना कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य संच मान्यता दिल्याप्रकरणी माध्यमिक उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शिस्तभंग, गैरवर्तणुकीसंदर्भात ठपका ठेवण्यात आला होता. डिसेंबर 2012 ते जानेवारी 2014 या काळात ते औरंगाबाद येथे शिक्षण उपसंचालक पदी कार्यरत असताना डेरे यांनी वेगवेगळ्या संस्थांची तपासणी करताना जवळपास 25 ते 50 कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता दिली होती. या संस्थांना त्यांच्याआधीच्या शिक्षण उपसंचालकांनी अपात्रठरवले होते.

TET Exam Scam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित; अटकेनंतर सरकारची कारवाई

बीडमधून एकाला अटक

पेपर फुटी प्रकरणात एका व्यक्तीला बीडमधून अटक करण्यात आली आहे. संजय सानप याला अटक करण्यात आली आहे. संजय शाहूराव सानप (40 रा. वडझरी, ता.पाटोदा, जिल्हा बीड ) याचा या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळल्याने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

    follow whatsapp