TET घोटाळा: सरकार कोणाला पाठिशी घालतंय?, अजित पवार प्रचंड संतापले

मुंबई तक

21 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:32 AM)

TET Scam मुंबई: शिक्षक भरतीसाठी जी टीईटी परीक्षा I(TET Exam) घेण्यात आली होती त्यात प्रचंड मोठा घोटाळा (Scam) झाला असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. याचबाबत आज (21 डिसेंबर) विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करुन अब्दुल […]

Mumbaitak
follow google news

TET Scam मुंबई: शिक्षक भरतीसाठी जी टीईटी परीक्षा I(TET Exam) घेण्यात आली होती त्यात प्रचंड मोठा घोटाळा (Scam) झाला असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. याचबाबत आज (21 डिसेंबर) विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित करुन अब्दुल सत्तारांना अप्रत्यक्षरित्यांना टार्गेट केलं आहे. (tet scam ajit pawar furious targets abdul sattar without naming him)

हे वाचलं का?

टीईटी परीक्षा 2019 ही नेमकी किती केंद्रांवर आयोजित केली होती. याबाबत सरकार हायकोर्टात आपली बाजू कधी मांडणार आहे असा सवाल यावेळी अजित पवारांनी केला. तसंच या प्रकरणात सरकार कोणाला पाठीशी घालत आहे का? असं म्हणत अजित पवारांनी सरकारला या मुद्द्यावरुन धारेवर धरलं आहे.

टीईटी परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तारांचं नाव का आलंय?; काय आहे नेमकं प्रकरण?

टीईटी घोटाळ्यावरुन अजित पवार संतापले

‘एखादा प्रश्न स्वीकृत व्हावा त्यासाठी त्याने 18 शर्थी पूर्ण केल्या पाहिजेत असं सरळ आपल्या नियम 70 मध्ये सांगितलंय. असं झालं नाही तर प्रश्न स्वीकृत करतात किंवा नियम 71 नुसार नियम 70 मधील शर्थीचे उल्लंघन करणाऱ्या प्रश्नात सुधारणा करु शकतात. त्यात तुम्हाला अधिकार आहे.’

‘माझा प्रश्न सुचनेतील वगळलेले प्रश्न भाग 18 शर्थीमधील कोणत्या शर्थी पूर्ण करत नाही? अध्यक्षांनी माझा प्रश्न सुचनेतील वगळलेला भाग हा असल्यास या यादीमध्ये विद्यामान मंत्री, आमदार यांची मुलं किंवा मुली, नातेवाईक यांचा पण समावेश आहे का? हे खरं आहे की नाही? हे विचारलेलं होतं. असल्यास संबंधित शिक्षकांवर 60 दिवसात सुनावणी घेऊन कारवाई करा असे आदेश असताना केवळ काही मंत्री महोदयांनी, काही आमदारांनी आणि काही अधिकाऱ्यांची मुलं-मुली या घोटाळ्यात असल्याने कारवाईला उशीर होत आहे हे खरं आहे का? असल्यास कोणत्याही राजकीय दबावापोटी सुनावणी न घेता पारदर्शक सुनावणी घेऊन कारवाईसाठी शासनाने काय उपाययोजना केली?’

‘जी मुलं मेरीटची होती ती राहिली बाजूला आणि ज्यांनी कॉपी केली ती झाली पास. ते मात्र नोकरीला लागले. हा कुठला न्याय? यासाठी मी जे काही सात प्रश्न विचारले होते. ते उपप्रश्न आलेले नाही. त्याबाबत मला उत्तर मिळालं पाहिजे.’ असं म्हणत अजित पवारांनी टीईटीच्या मुद्द्यावर घेरलं.

टीईटी घोटाळा : 7,800 नापास उमेदवारांना पैसे घेऊन केलं पास; समोर आली धक्कादायक माहिती

या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईबाबत माहिती सभागृहासमोर मांडण्यात येईल असं स्पष्ट केलं. तसेच संबंधितांवर कारवाई देखील निश्चित केली जाईल असं जाहीर केलं. त्यामुळे आता संपूर्ण प्रकरणात नेमकं कोणावर कारवाई होणार आणि मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp