Pune Crime News : पुण्यात 19 मे 2024 रोजी झालेल्या पोर्श कार अपघाताचं प्रकरण देशभर गाजलं होतं. या प्रकरणात आता एक धक्कादायक वळण आलं आहे. रक्त तपासणीत फेरफार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कामगार कंत्राटदार आणि त्यांच्या मित्राच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. अपघाताच्या वेळी कंत्राटदाराचा मुलगा आणि आणखी एक अल्पवयीन मुलगा पोर्शे कारचालकासोबत कारमध्ये होता. पोलिसांचा दावा आहे की, ज्वेलर मित्राने कंत्राटदाराच्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करण्यासाठी स्वतःचा रक्ताचा नमुना दिला. मात्र, वकिलांनी पोलिसांवरच आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
आरोपींचे वकील काय म्हणाले?
बचाव पक्षाचे वकील अबीद मुलानी आणि सितेश शर्मा यांनी आरोपींच्या वतीनं युक्तिवा केला. सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पक्षकारांनी रक्त चाचणी हेराफेरीसाठी कोणतीही लाच दिली नाही. दोन्ही आरोपींची अटक बेकायदेशीर होती. चालकाच्या आईला जसा जामीन मिळाला, तसाच या दोघांनाही जामीन मिळावा असं वकिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन चालक मुलाच्या आईला 22 एप्रिलला जामीन मिळाला.
हे ही वाचा >> रात्री उशिरा फोनवर बोलते म्हणून मामाने फोन हिसकावला, मुलीनं थेट 11 व्या मजल्यावरुन... ठाण्यातली धक्कादायक घटना
वकिलांनी असा दावा केला की, पोलिसांनी खोटा फौजदारी कटाचा खटला तयार करण्यासाठी लाचेचा आरोप केला. यातून त्यांनी फौजदारी न्यायव्यवस्थेशी खेळ केला. ससून जनरल रुग्णालयात अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करण्यासाठी आरोपींनी सह-आरोपींसोबत कट रचल्याचा कोणताही पुरावा नाही, असं वकील म्हणाले.
पोलिसांनी काय म्हटलं?
विशेष सरकारी वकील शिशीर हिराय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादाला उत्तर देण्यासाठी 3 मे पर्यंत वेळ मागितला. न्यायालयीन कार्यवाहीनंतर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितलं की, बचाव पक्षाच्या वकिलांचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने हे वृत्त दिलं आहे.
हे ही वाचा >> Railway Recruitment: रेल्वेमध्ये 'या' पदांसाठी मोठी भरती; अप्लाय करण्याची शेवटची तारीख कोणती? कसं आणि कुठे कराल अप्लाय?
पोलीस म्हणाले, "बँक स्टेटमेंट्स आणि साक्षीदारांच्या जबानींचा पुरावा आहे. त्यामुळे रक्त नमुना अहवालात हेराफेरीसाठी 2 लाख रुपये दिल्याचं दिसतं. आरोपींच्या अटकेची कारणं त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आली होती. त्यांच्या स्वाक्षऱ्याही अटक फॉर्मवर घेण्यात आल्या होत्या. ते फॉर्म आरोपपत्रांचा भाग होते." आरोपी बरोबरीच्या आधारावर जामीन मागू शकत नाहीत, कारण सुप्रीम कोर्टाचा कार चालकाच्या आईच्या प्रकरणातील आदेश हा अंतरिम आदेश आहे, अंतिम आदेश नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
