‘ठाकरेंनी गद्दारी तर..’, सुभाष देसाईंच्या मुलाच्या पक्षप्रवेशानंतर CM शिंदेचा वार

मुंबई तक

13 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:38 PM)

CM Eknath Shinde: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) याचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) पक्षात जाहीर प्रवेश केला. खरं तर हा वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी […]

Mumbaitak
follow google news

CM Eknath Shinde: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) UBT पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) याचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी आज (13 मार्च) शिवसेना (शिंदे गटात) पक्षात जाहीर प्रवेश केला. खरं तर हा वैयक्तिकरित्या उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुभाष देसाई हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी आहेत. अशावेळी त्यांच्याच मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना हा शिंदेकडून मोठा शह असल्याचं बोललं जात आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ज्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. (thackeray betrayed with bjp in 2019 cm shinde criticized uddhav thackeray after subhash desai son entered in shiv sena

हे वाचलं का?

2019 लाच उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर यावेळी केला आहे. सुभाष देसाईंच्या मुलाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारची टीका शिंदेंनी केली आहे.

पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले:

‘मुंबईतील अनेक प्रकल्पांची कामं आम्ही हाती घेतलं आहे. हे सगळं जे काही काम आहे.. हे खऱ्या अर्थाने मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे होती अनेक वर्ष.. त्यांना ते करता आलं नाही. दुर्दैवाने लोकांना अनेक वर्ष खड्ड्यातून प्रवास करावा लागला. अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागलं. त्यामुळे आता लोकांमध्ये भावना निर्माण झाली आहे की, हे काम करणारे लोकं आहेत, हे काम करणारं सरकार आहे.’

‘हे सगळी कामं आणि बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका लक्षात घेऊन भूषण देसाईंनी मला सांगितलं की, आपल्यासोबत काम करायचं आहे. त्यामुळे भूषण देसाई यांनी देखील निर्णय घेतला आहे की, काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचं आणि विकासाभिमुख निर्णय घेणारं सरकार म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,

एकनाथ शिंदे यांची संपूर्ण माहिती : पत्नी, कुटुंब, संपत्ती आणि मातोश्रीला आव्हान… असा आहे प्रवास

दरम्यान, यावेळी पत्रकाराने मुख्यमंत्री शिंदेंना असं विचारलं की, आदित्य ठाकरे म्हणाले की, गद्दार आमच्यावर असेच वार करत राहणार. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर लागलीच पलटवार केला.

Jogendra kawade : हाजी मस्तानसोबत पार्टी काढणारा नेता एकनाथ शिंदेंसोबत

शिंदे म्हणाले की, ‘ठाकरेंनी स्वत: विचार केला पाहिजे ना.. की चूक कोणाची आहे आणि गद्दारी तर मतदारांशी, हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी केली? 2019 लाच झालं ना ते.. लोकांशी विश्वासघात, बेईमानी.. ज्यांनी बहुमत शिवसेना-भाजप युतीला. असं आम्ही बोलू शकतं.. पण त्यांना बोलू दे.. आम्ही काम करतोय. या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केली आहे.

आता एकनाथ शिंदेंच्या या टीकेला ठाकरे गटाकडून कसं प्रत्युत्तर दिलं जाणार आणि येत्या काळात उद्धव ठाकरे हे डॅमेज कंट्रोल हे कशा पद्धतीने करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंच्या कुटुंबातच फूट; पुत्र एकनाथ शिंदेंसोबत!

    follow whatsapp