2016 मध्ये मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना मिळणार 4.13 कोटी रुपयांचा विक्रमी मोबदला

मुंबई तक

• 09:47 AM • 28 Aug 2022

मुंबई: मोबादला म्हणून अलिकडच्या काळात रक्कम मिळणं फार अवघड झालं आहे. अशातच एका व्यावसायीकाच्या कुटुंबाला मोबादला म्हणून कोट्यावंधींची रक्कम मिळणार आहे. २०१६ मध्ये एका कपडे व्यावसायीकाचा डंपरच्या धडकेने मृत्यू झाला होता, त्याच्या कुटुंबाला ट्रकच्या मालकाने आणि न्यू इंडिया अॅश्युरन्सने संयुक्तपणे 4.13 कोटी रुपये (व्याजासह) द्यावे असे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत. न्यायाधिकरण व्यावसायीक […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मोबादला म्हणून अलिकडच्या काळात रक्कम मिळणं फार अवघड झालं आहे. अशातच एका व्यावसायीकाच्या कुटुंबाला मोबादला म्हणून कोट्यावंधींची रक्कम मिळणार आहे. २०१६ मध्ये एका कपडे व्यावसायीकाचा डंपरच्या धडकेने मृत्यू झाला होता, त्याच्या कुटुंबाला ट्रकच्या मालकाने आणि न्यू इंडिया अॅश्युरन्सने संयुक्तपणे 4.13 कोटी रुपये (व्याजासह) द्यावे असे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत.

हे वाचलं का?

न्यायाधिकरण व्यावसायीक भरत असलेल्या आय-टी रिटर्नचा विचार करुन म्हटले “एक वैधानिक दस्तऐवज आहे. ज्यावर मृतकाचे वार्षिक उत्पन्न किती होते ते निश्चित करता येईल”. न्यू इंडिया अॅश्युरन्सने मृत झालेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केले नसल्यामुळे, त्याच्या मृत्यूसाठी तो जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, विमा कंपनीच्या या दाव्याचे त्यांनी खंडन केले आहे. मृतकाच्या कुटुंबानं 3 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.

डंपरच्या चालकाकडे वैध परवाना नव्हता: विमाकर्ता

2016 मध्ये डंपरच्या धडकेने मृत्यू झालेल्या जमील शेख यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहा मुलांना 4.13 कोटींची भरपाई दिली जाणार आहे. त्यांनी 7 नोव्हेंबर 2016 रोजी डंपर ट्रक मालक गौरी जाधव आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी यांच्या विरोधात मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती.

कुटुंबीयांनी सांगितले की, 28 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 3-4 च्या दरम्यान जमील साकीनाकाहून पवईकडे मोटरसायकलवरून जात असताना, ट्रकने मागून वेगात येऊन धडक दिली त्यात ते खाली पडले. जमील यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. निष्काळजीपणामुळे जमील यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालकावर एफआयआर दाखल करण्यात आला. यानंतर डंपर मालकाने दाव्याला प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांच्या विरुद्ध आदेश पूर्वपक्ष पारित करण्यात आला.

विमा कंपनीने असा युक्तिवाद केला की जमील यांनी कायद्याने अनिवार्य असलेले हेल्मेट घातले असते तर डोक्याला झालेली दुखापत टाळता आली असती. पुढे युक्तीवादात त्यांनी म्हटले की अपघाताच्या वेळी जमील यांच्याकडे वैध ड्रायव्हिंग परवाना नव्हता. त्यामुळे विमाधारकाने पॉलिसीच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केला असल्याचे म्हणत डंपर मालकाने नुकसान भरपाई देण्याचे टाळले होते.

न्यायाधिकरणाने म्हटले ”विमा कंपनीने त्यांच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पुरावे सादर केलेले नाहीत. डंपरच्या चालकाचा परवाना बनावट होता, हे सिद्ध झालेले नाही. त्याशिवाय, परवाना बनावट आहे, असे गृहीत धरले तरी, या वस्तुस्थितीची माहिती वाहनाच्या मालकाला असण्याचा कोणताही पुरावा नाही. आणि माहिती असूनही, मालकाने चालकाला आक्षेपार्ह वाहन चालविण्याची परवानगी देण्याचे ठरवले.”

या महिन्याच्या सुरुवातीला, न्यायाधिकरणाने दोन विमा कंपन्यांना भांडुपस्थित 65 वर्षीय महिलेला सुमारे 3 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्हची आईचा 2016 मध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर थांबलेल्या वाहनावर कार धडकल्याने मृत्यू झाला होता. 38 वर्षीय पीडित भूषण जाधव हा सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून काम करत होता, त्याला सुमारे 2 लाख रुपये मासिक पगार मिळत होता. त्याचे लग्न ठरलेले होते.

    follow whatsapp