शरीरातील मधुमेहाचे प्रमाण वाढले? ‘या’ 4 सवयी ठरू शकतात घातक…

रोहिणी ठोंबरे

• 11:18 AM • 17 Apr 2023

आपल्या शरीरातील साखरेची पातळी (मधुमेह) वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला पोषक नसलेले अन्न आणि इतर काही गोष्टी मधुमेहाचे प्रमाण वाढण्यामागील कारण आहे.

Diabetes

Diabetes

follow google news

Diabetes : आपल्या शरीरातील साखरेची पातळी (मधुमेह) वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला पोषक नसलेले अन्न आणि इतर काही गोष्टी मधुमेहाचे प्रमाण वाढण्यामागील कारण आहे. यासाठी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (These 4 habits can be dangerous for increasing diabetes level in the body)

हे वाचलं का?

आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्यामुळे आपल्या शरीरातील साखर कमी तसेच नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.

कामगार ते खासदार… कसे होते गिरीश बापट?, शरद पवारांनी सांगितले किस्से

रात्री जास्त वेळ जागरण करू नये

सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला तासंतास रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय लागली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेच्या समस्यां उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दररोज किमान 7 ते 8 तास घेणे गरजेचे आहे. यामुळे केवळ आपले आरोग्य आणि मनच नाही तर, रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. रात्री जास्तवेळ मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केल्याने अधिक भूक लागते यावेळी काहीजण अशा पदर्थांचे सेवन करतात ज्याचा वाईट परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होतो.

12 श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणात राज ठाकरेंनी शिंदे सरकारला दिली क्लीन चीट, Tweet मध्ये काय?

शारीरिक हालचाली न करणे

अनेक लोक आहेत जे कोणत्याही शारीरिक हालचाली करत नाहीत. जेव्हा आपण जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह नसतो त्यावेळी शरीरात अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात. निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचालींचा दैनंदिन जीवनात नक्कीच समावेश करा. यामुळे आपण स्वस्थ तर राहतोच याशिवाय साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

एखाद्या गोष्टीचे अधिक टेन्शन घेणे

कोणत्याही गोष्टीचा विचार जास्त केल्यास किंवा त्याचे टेन्शन घेतल्यास आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम उद्भवतो. टेन्शन घेतल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण ढासळते. तर एपिनेफ्रीन आणि कोर्टिसोलसारके तणावाचे हार्मोन्स वाढू लागतात. ज्यामुले आपले साखरेचे प्रमाण वाढते. अशात टेन्शन कमी घेणे अधिक गरजेचे आहे.

Uddhav Thackeray यांना हायकोर्टाचा दणका; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय योग्य

कॅलरीजची विशेष काळजी घेणे गरजेचे

शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसभरात आपण आहारात किती कॅलरीज घेत आहोत याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर शरीरातील कॅलरीज कमी करयच्या असल्यास, आपल्या आहारात प्रथिने, चरबी, कार्बोहाइड्रेट नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच तुमच्या आहारात फायबरचा समावेश करणे गरजेचे आहे.

    follow whatsapp