टूलकिट प्रकरणी एका विद्यार्थीनीला अटक

पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने काही दिवासांपूर्वी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर तिने केलेल्या ट्विटमध्ये एक टूलकिट शेअर केली होती. नंतर त्या टूलकिट प्रकरणी आता दिल्ली पोलिसांकडून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती आणि विद्यार्थी असलेल्या दिशा रवि नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिला तिच्या बंगळुरूमधील घरातून ताब्यात घेण्यात […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 08:21 AM • 14 Feb 2021

follow google news

पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने काही दिवासांपूर्वी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलं होतं. त्यानंतर तिने केलेल्या ट्विटमध्ये एक टूलकिट शेअर केली होती. नंतर त्या टूलकिट प्रकरणी आता दिल्ली पोलिसांकडून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका 21 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती आणि विद्यार्थी असलेल्या दिशा रवि नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. तिला तिच्या बंगळुरूमधील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यावर टूलकिटमध्ये बदल केल्याचा आरोप आहे.

हे वाचलं का?

ग्रेटा थनबर्गने टूलकिट शेअर केल्यावर दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारीला गुन्हा नोंदवला होता. त्याच प्रकरणात आता पोलिसांनी दिशा रवि ला ताब्यात घेतलं आहे. दिशा बंगळुरूतल्या सोलदेवानापल्ली परिसरातील रहिवासी असून शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी काही मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. चौकशीदरम्यान तिने टूलकिटमध्ये बदल करून पुढे पाठवल्याची कबूली दिल्याचंही पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ग्रेटा थनबर्गने हवामान बदलाच्या मुद्द्यावरून शाळेत संप केला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्या पावलावर पाऊल ठेवत या मोहिमेत भाग घेतला. दिशा रवि देखील हवामान बदलांशी संबधित फ्रायडे फॉर फ्यूचर या अभियानाची संस्थापक सदस्य आहे.

    follow whatsapp