केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचं Twitter Account आधी Block मग Unblock

मुंबई तक

• 10:46 AM • 25 Jun 2021

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचं Twitter अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक ठेवण्यात आलं होतं जे आता अनब्लॉक करण्यात आलं आहे. Twitter ने सरासरी एक तासासाठी हे अकाऊंट ब्लॉक केलं होतं. रविशंकर प्रसाद यांनी कू या नव्या अॅपवरून याची माहिती दिली आहे. Twitter ने मात्र अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. काय आहे […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांचं Twitter अकाऊंट एक तासासाठी ब्लॉक ठेवण्यात आलं होतं जे आता अनब्लॉक करण्यात आलं आहे. Twitter ने सरासरी एक तासासाठी हे अकाऊंट ब्लॉक केलं होतं. रविशंकर प्रसाद यांनी कू या नव्या अॅपवरून याची माहिती दिली आहे. Twitter ने मात्र अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे रविशंकर प्रसाद यांची पोस्ट?

मित्रांनो आज ही घटना घडली आहे. Twitter ने माझं अकाऊंट अॅक्सेस करण्यापासून मला तासाभर रोखलं होतं. माझ्यावर डिजिटल मिलेनिअम कॉपीराईट अॅक्टचा यूएसएचा भंग केल्याचा आरोपही करण्यात आला होता. आता अचानक माझं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. एक तासासाठी ही कारवाई करण्यात आली होती.

समजून घ्या : Twitter India आणि मोदी सरकारमध्ये नेमका वाद काय? का दाखल झाला FIR?

Twitter ने काय म्हटलं आहे?

आज सकाळी म्हणजे 25 जूनला ही कारवाई केली गेली असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. मात्र ट्विटरने अशी काही कारवाई झालं नाही असं म्हटलं आहे. रविशंकर प्रसाद यांचं ट्विटर अकाऊंट कुणीही पाहू शकतं आहे. मंत्रीमहोदयांचे ट्विटर अकाऊंट इतर कुणीही लॉग इन करू शकत नाही. ट्विटरतर्फे कुणीही ते लॉक करण्याची किंवा ब्लॉक करण्याची प्रक्रिया झालेली नाही. जेव्हा मंत्र्यांनी किंवा त्यांच्या ट्विटर टीमपैकी कुणीही जेव्हा ते अकाऊंट अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तुमचं अकाऊंट लॉक कऱण्यात आलं आहे असा संदेश आला. कारण ट्विटरने तुमच्या ट्विटर खात्यावर पोस्ट केलेल्या आशयाची सुसंगत डिजिटल मिलेनियम कॉपीराइट (अॅक्ट (डीएमसीए) नोटीस प्राप्त झाली आहे. डीएमसीए अंतर्गत कॉपीराइट मालक वापरकर्त्याने त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामांचे उल्लंघन केले असा दावा करून ट्विटरला सूचित करू शकतात.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 16 जूनला ट्विटरने भारतात असलेलं कायदेशीर संरक्षण गमावलं आहे. मोदी सरकारने ट्विटरवर केलेली ही मोठी कारवाई मानली जाते आहे. ट्विटर हे एक समाज माध्यम आहे. ट्विटर युझरने त्याच्या हँडलवरून काही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर मजकूर ट्विटर केला तर आधी ट्विटरवर कारवाई होत नव्हती. आता मात्र असं होणार नाही. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तब्बल 9 ट्विट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी मोदी सरकारची भूमिका मांडली आहे. मोदी सरकारने खोट्या बातम्या, अफवा तसंच बदनामी यांना पायबंद घालण्यासाठी सोशल मीडियासंदर्भात नवी नियमावली जारी केली होती. त्या नियमावलीची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधीही सर्व सोशल प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट कंपन्यांना देण्यात आला होता असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता 9 दिवसांनी रविशंकर प्रसाद यांचंच ट्विटर अकाऊंट ब्लॉक-अनब्लॉक करण्यात आलं आहे.

    follow whatsapp