Udayanraje: संजय राऊत कोण? मी ओळखत नाही पण कुणी वाईट बोललं तर गप्प बसणार नाही

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे सरकार विरूद्ध भाजप यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. भाजपचे खासदार उदयनराजेंवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर संजय राऊत यांनी जी टीका केली त्याचा समाचार आता उदयनराजेंनी घेतला. कोण संजय राऊत मी ओळखत नाही असाही टोला त्यांनी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:12 AM • 10 Jun 2022

follow google news

महाराष्ट्रात आणि देशात राज्यातल्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे सरकार विरूद्ध भाजप यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. भाजपचे खासदार उदयनराजेंवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर संजय राऊत यांनी जी टीका केली त्याचा समाचार आता उदयनराजेंनी घेतला. कोण संजय राऊत मी ओळखत नाही असाही टोला त्यांनी लगावला.

हे वाचलं का?

शिवेंद्रराजे आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरून संजय राऊत यांनी शिवेंद्रराजेंवर टीका केली आहे. संभाजीराजेंच्या राज्यसभेचा विषय हा शिवसेना आणि त्यांच्यातला आहे. इतर कुणीही त्यात चोंबडेपणा करू नये. भाजपला एवढं वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजेंना ४२ मतं द्यायला हवी होती असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली होती. यानंतर साताऱ्यातल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उदयनराजेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले उदयनराजे?

संजय राऊत कोण आहेत मला माहित नाही. आम्ही कुणाबाबत वाईट बोलत नाही. मात्र आमच्याबद्दल कुणी वाईट बोललं तर आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घरण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कुणीही गप्प बसणार नाही, बाकी पेटलं तरीही चालेल बघतोच असं म्हणत उदयनराजेंनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला उदयनराजेंनी बुलेट बक्षीस म्हणून देणार असल्याचीही घोषणा आजच्या कार्यक्रमात केली. सातारा येथील उदयनराजेंच्या जलमंदिर या निवासस्थानी या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी उदयनराजेंनी संजय राऊत यांनी टीका केली आहे. आज पृथ्वीराज पाटीलला जी बुलेट देण्यात आली त्या बुलेटला उदयनराजेंचा आवडता ००७ हा नंबरही देण्यात आला आहे.

    follow whatsapp