बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई तक

• 01:34 PM • 01 Feb 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हणजेच बजेटवर टीका केली आहे. अर्थसंकल्प अर्थात बजेट हे निवडणुकांसाठी हवं निवडणुकांसाठी नको असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बजेटवर टीका केली आहे. डोंबिवलीतल्या काही मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना बजेटबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर म्हणजेच बजेटवर टीका केली आहे. अर्थसंकल्प अर्थात बजेट हे निवडणुकांसाठी हवं निवडणुकांसाठी नको असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बजेटवर टीका केली आहे. डोंबिवलीतल्या काही मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना बजेटबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या बजेटवर टीका केली आहे. तसंच अर्थसंकल्पाची सगळी माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरेंचीही टीका

याआधीच बजेटवर आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काय तरतूद आहे असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी आहेत पण ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्यांनाच झुकतं माप देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं ते शोधावंच लागेल असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत भाजपच्या नेत्यांनी तसंच पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे. आज सादर झालेलं बजेट हे देशाला करोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाच्या चक्रातून देशाला बाहेर काढणारं आहे असं भाजपने म्हटलं आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या बजेटवर टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत यांचंही टीकास्त्र

बजेट सादर झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आज सादर झालेल्या बजेटमध्ये महाराष्ट्र कुठे दिसलाच नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp