Narayan Rane: “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार”

मुंबई तक

• 02:52 PM • 31 Aug 2022

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, दसरा मेळावाही त्यांचाच होणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच जर दसरा मेळावा झाला तर तो एकनाथ शिंदेंचाच असेल. त्यात मला बोलावलं तर मी देखील जाईन असंही […]

Mumbaitak
follow google news

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, दसरा मेळावाही त्यांचाच होणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसंच जर दसरा मेळावा झाला तर तो एकनाथ शिंदेंचाच असेल. त्यात मला बोलावलं तर मी देखील जाईन असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले आहेत नारायण राणे दसरा मेळाव्याबाबत?

दसरा मेळावा झाला तर तो होईल एकनाथ शिंदेंचाच. एकनाथ शिंदेंनी बोलावलं तर मीपण जाईन. शिवसेनेचा पूर्वीचा शिवसैनिक कसा होता? नेता कसा होता? मुख्यमंत्री कसा होता त्याचा प्रत्यय मी तिथे घडवून देईन. जुने शिवसैनिकच त्या मंचावर दिसतील. प्रामाणिक, निष्ठावान, जाणते शिवसैनिक हे तिथे मंचावर दिसतील. या व्याख्येत जे बसत नाहीत ते घरी असतील असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Narayan Rane: “उद्धव ठाकरेच गद्दार! एकनाथ शिंदेसारख्या कडवट शिवसैनिकांशी गद्दारी करून..”

उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं

उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून सत्ता आणली होती. भाजपसोबत निवडून यायचं. मोदींसोबत युती करायची, भाजपशी हातमिळवणी करायची आणि निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी अभद्र युती केली. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते ते या अभद्र युतीमुळेच. नाहीतर एक दिवसही त्या पदावर बसण्याची पात्रता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो व्यक्ती मंत्रालयात जात नाही.

कॅबिनेटमध्ये जात नाही. सभागृहात बसत नाही, असला कसला मुख्यमंत्री? आता खोके वगैरे टीका सुरू केली आहे. काय त्याला अर्थ आहे का. एकनाथ शिंदेंना कंत्राटी सरकार यांनी म्हटलं होतं. मात्र गणरायाने कंत्राटी सरकार घालवलं. इतका अपमान झाल्यावर तरी गप्प घरात बसा असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे-फडणवीस सरकार हे आता चांगलं कामकाज करतील अशी अपेक्षा मला आहे.

सत्ता गेली तरी एक उंदीर फिरतोय राज्यात

उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, एवढी सत्ता गेली तरीही एक उंदीर राज्यात फिरतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जोरावर. फिरू द्या त्यामुळे काहीही फरक पडणार नाही असं म्हणत नारायण राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर टीका केली आहे.

    follow whatsapp