लग्नसोहळ्यावर शोककळा, विहिरीत पडून 13 महिला आणि मुलींचा मृत्यू

लग्नसोहळा सुरू होता, सगळीकडे आनंदाचं वातवरण होतं. धमाल मस्ती सुरू होती… अशातच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. 13 महिला आणि मुलींचा विहीरीत पडून अंत झाला आहे. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक आणि इतर लोक या मदत आणि बचावकार्यात सहभागी झाले […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:15 AM • 17 Feb 2022

follow google news

लग्नसोहळा सुरू होता, सगळीकडे आनंदाचं वातवरण होतं. धमाल मस्ती सुरू होती… अशातच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. 13 महिला आणि मुलींचा विहीरीत पडून अंत झाला आहे. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक आणि इतर लोक या मदत आणि बचावकार्यात सहभागी झाले आहेत.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर भागात रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.लग्नसोहळा जिथे सुरू होता त्याच ठिकाणी असलेल्या विहिरीत 12 हून अधिक मुली आणि महिला पडल्या. नेबुआ जिल्ह्यातील नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्कूल टोला भागातील एका घरात लग्न होतं. त्यामुळे इतर घरातील महिला आणि मुली लग्नघराजवळ असलेल्या विहीरीजवळ उभ्या होत्या. हळद लावण्याचा कार्यक्रम तेव्हा सुरू होता. अशात विहिरीची लोखंडी जाळी तुटली आणि 12 पेक्षा जास्त महिला आणि मुली या विहिरीत पडल्या. या घटनेत 13 जणींचा मृत्यू झाला आहे.

कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगम यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, “अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.” ते म्हणाले, “नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती, जिच्यावर स्लॅब होता. त्या स्लॅबवर लग्नसोहळ्या दरम्यान लहान मुली आणि महिला बसल्या होत्या, त्या दरम्यान स्लॅब कोसळला आणि मलबा त्यांच्यावर पडला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ही धक्कादायक घटना घडली तेव्हा तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर स्थानिकांनी बचावकार्यही सुरू केलं. या घटनेत 13 मुली आणि महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे आता गावकऱ्यांची गर्दी झाली आहे. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काय म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशीनगर मध्ये घडलेल्या या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. ‘उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी आहे. ज्या घरातील महिलांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसंच जे या घटनेत जखमी झालेत ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही करतो’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

    follow whatsapp