‘सदावर्ते, खोत, पडळकरांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला’; एसटी कर्मचाऱ्याचा आरोप

मुंबई तक

01 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:16 PM)

MSRTC EMPLOYEE AGITATION : धाराशिव : अखेर 12 तासानंतर धाराशिव (Dharashiv ) जिल्ह्यातील कळंब आगारचा कर्मचारी टॉवरवरून खाली उतरला आहे. आपल्या मागणीसाठी 200 फूट टॉवरवर (Tower) चढून बसला होता. यादरम्यान त्याने गंभीर आरोप केले आहेत. विशेषतः माजी (Sadabhau khot) राज्यमंत्री सदाभाऊ खोत, (Gopichand padalkar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna […]

Mumbaitak
follow google news

MSRTC EMPLOYEE AGITATION : धाराशिव : अखेर 12 तासानंतर धाराशिव (Dharashiv ) जिल्ह्यातील कळंब आगारचा कर्मचारी टॉवरवरून खाली उतरला आहे. आपल्या मागणीसाठी 200 फूट टॉवरवर (Tower) चढून बसला होता. यादरम्यान त्याने गंभीर आरोप केले आहेत. विशेषतः माजी (Sadabhau khot) राज्यमंत्री सदाभाऊ खोत, (Gopichand padalkar) भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यादरम्यान घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

हे वाचलं का?

MSRTC : ‘या’ मागणीसाठी गळ्यात फास अडकवून एसटी कर्मचारी चढला टॉवरवर

सदावर्ते, खोत आणि पाडळकरांवर गंभीर आरोप

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केला, असा आरोप या एसटी कर्मचाऱ्याने केला आहे. तर सदावर्ते यांनी वकिलीच्या नावाखाली पैसे लुबाडले असून केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी कर्मचाऱ्यांचा वापर केल्याचा आरोप ही त्याने केला आहे. आता यांच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नसून. राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या कर्मचाऱ्याने घेतला होता. शेवटी तोंडी आश्वासन दिल्यानंतर हा कर्मचारी खाली उतरला.

12 तासांपासून टॉवरवर चढून बसला होता कर्मचारी

तत्कालीन सरकार सातवा वेतन आयोग लागू करायला तयार होतं, मात्र काही लोकांमुळे ते होऊ शकलं नाही, असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी गेल्या 12 तासांपासून हा कर्मचारी टॉवरवर 200 फूट उंचीवर जाऊन बसला होता. महामंडळातील प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे कर्मचारी यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन लागू करावा, या मागणीसाठी हा कर्मचारी कळंब शहरातील बीएसएनएलच्या टॉवरवर गळ्यात फास अडकवून चढला होता. अखेर आश्वासनानंतर या कर्मचाऱ्याने मवाळ भूमिका घेतली.

ST Strike: …म्हणून एसटी कर्मचारी हातात बांगड्या घालून कामावर आला!

यापूर्वी देखील झाडावर चढून केलं होतं आंदोलन

गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय विलीनीकरणाच्या मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यादरम्यान देखील पुरी यांनी कळंब आगाराच्या प्रवेशद्वारावरील असलेल्या झाडावर चढून आंदोलन केलं होतं. नंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन केलं होतं. आता मात्र त्याने सदावर्ते यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी वापर केल्याचा आरोप केलाय. तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

    follow whatsapp