Vidhan Sabha Live : MPSC च्या रिक्त पदांबद्दल अजित पवारांची सभागृहात महत्वाची घोषणा

मुंबई तक

• 08:01 AM • 06 Jul 2021

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी १२ आमदारांच्या निलंबनावरुन झालेला गदारोळ दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. दरम्यान राज्यात गाजत असलेल्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. MPSC ची रिक्त पद तातडीने भरण्याला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलत असताना याबद्दलची माहिती दिली. “राज्यात किती […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी १२ आमदारांच्या निलंबनावरुन झालेला गदारोळ दुसऱ्या दिवशीही कायम राहिला. दरम्यान राज्यात गाजत असलेल्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. MPSC ची रिक्त पद तातडीने भरण्याला वित्त विभागाने मान्यता दिली आहे.

हे वाचलं का?

उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलत असताना याबद्दलची माहिती दिली. “राज्यात किती रिक्त पद आहेत? तसेच किती नियुक्त्या रखडल्या आहेत? याची माहिती घेऊन प्रलंबित परीक्षांचे निकाल तातडीने लावले जातील. याचसोबत रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. २०१८ पासून प्रलंबित असलेली अ, ब आणि क अशा ३ गटांमध्ये मिळून १५ हजार ५०१ पदं भरण्यात येतील.”

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. एमपीएससीचा कारभार स्वैराचारासारखा सुरु आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना राज्य सरकार काय करत आहे असा सवाल फडणवीसांनी विचारला. ज्याला उत्तर देताना उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलैपर्यंत MPSC वरील रिक्त पद भरली जातील असं आश्वासन दिलं. यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात प्रलंबित जागा भरण्याची घोषणा पवारांनी केली आहे.

    follow whatsapp