Valentine Week 2025 : प्रपोज कधी कराल, गुलाब कधी द्याल? यंदाचा व्हॅलेंटाईन खास बनवा, आठवडाभराचा प्लॅन

व्हॅलेंटाईनमध्ये नेमक्या कोणत्या दिवशी काय पद्धतीचं सेलीब्रेशन केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का?

Mumbai Tak

मुंबई तक

05 Feb 2025 (अपडेटेड: 05 Feb 2025, 12:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

यंदाचा व्हॅलेंटाईन कसा बनवाल खास?

point

व्हॅलेंटाईन डे साठी तुमचा काय प्लॅन?

point

कोणत्या दिवशी काय कराल? वाचा सविस्तर

Valentine Week 2025 : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा सिझन. याचं कारण म्हणजे याच फेब्रुवारीमध्ये येतो अनेकांना आवडणारा व्हॅलेंटाईन विक. याच आठवड्यात या व्हॅलेंटाईन विकला सुरूवात होणार आहे. मात्र, या व्हॅलेंटाईनमध्ये नेमक्या कोणत्या दिवशी काय पद्धतीचं सेलीब्रेशन केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हालाही हा प्रेमाचा सप्ताह आनेंदात साजरा करायचा असेल, तर सविस्तर वाचा.

हे वाचलं का?


7 फेब्रुवारी - रोज डे
गुलाबांचा उल्लेख केल्याशिवाय प्रेमाबद्दल बोलणं शक्य नाही. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात एकमेकांना गुलाब देऊन होते. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. खरंतर, व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोझ डे. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाब देऊ शकता.

हे ही वाचा >> Rahul Solapurkar : "दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली, गुन्हा दाखल झाला पाहिजे", अंधारे, मिटकरी आक्रमक

8 फेब्रुवारी - प्रपोज डे
व्हॅलेंटाईन वीक दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी, तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा जोडीदार बनवू इच्छिता त्याच्यावर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

9 फेब्रुवारी - चॉकलेट डे 
व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट देऊन साजरा केला जातो. म्हणूनच त्याला चॉकलेट डे म्हणतात. या दिवशी, जोडपे एकमेकांना खास चॉकलेट किंवा चॉकलेटपासून बनवलेले पदार्थ देऊन त्यांच्या नात्यात गोडवा आणू शकतात.

10 फेब्रुवारी - टेडी डे 
महिला आणि मुलींना टेडी बिअर भरपूर आवडतात. जर तुम्ही तिला टेडी भेट दिली तर तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ती नक्कीच आनंदी होते. त्यामुळे तुम्ही जोडीदारालाच नाही तर तुमच्या मैत्रिणींनाही टेडी देऊ शकता.

हे ही वाचा >> Kangana Ranaut च्या अडचणी वाढणार? अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची कोर्टाकडे मागणी

11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
कोणतंही नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांना वचन देणं खूप महत्वाचं आहे. व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व जोडपी एकमेकांवर प्रेम करण्याचं आणि शक्य तितक्या सर्व प्रकारे एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात.

12 फेब्रुवारी - हग डे 
तुम्ही एखाद्यावर किती प्रेम करता हे दाखवण्याचेअनेक मार्ग आहेत, पण सर्वात प्रेमळ मार्ग म्हणजे एखाद्याला मिठी मारणे. हग डे म्हणजेच व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारून तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

13 फेब्रुवारी - किस डे 
व्हॅलेंटाईन वीकचा 7 वा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराचं चुंबन घेऊन तुमच्या हृदयात लपलेल्या प्रेमाबद्दल त्याला सांगू शकता.

14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे 
सात दिवस वेगवेगळ्या प्रकारे प्रेम व्यक्त केल्यानंतर, तुम्ही ज्या टप्प्यावर पोहोचता तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारीला साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे हा बहुतेक जोडप्यांना एकमेकांसोबत साजरा करायचा असतो. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तिंसोबत खास प्लॅन करू शकता. तुमच्या लव्ह लाईफची खास सुरूवात सुद्धा करू शकता. 

    follow whatsapp