Walmik Karad हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माईंड, CID चं आरोपपत्र

मुंबई तक

01 Mar 2025 (अपडेटेड: 01 Mar 2025, 01:54 PM)

फरार झालेला वाल्मिक कराड हा 20-22 दिवसांनंतर नाट्यमयरित्या पोलिसांसमोर हजर झाला होता. त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या असून, तो मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असल्यानं पर्यायाने धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट

point

बीड प्रकरणात सर्वात मोठी अपडेट

point

वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्च शीट दाखल केली असून, वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणात सुरूवातीपासून वाल्मिक कराडवर संशय व्यक्त केला जात होता. फरार झालेला वाल्मिक कराड हा 20-22 दिवसांनंतर नाट्यमयरित्या पोलिसांसमोर हजर झाला होता. त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या असून, तो मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असल्यानं पर्यायाने धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल.

हे वाचलं का?

चार्जशीटमधील आरोपांनतर सुरेश धस काय म्हणाले?


"फोनो वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड, मुख्य सूत्रधार, याचा आका.. सगळं काही तोच आहे. हा आकाच सगळं काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत यांना सहकार्य करणं, मदत करणं, पैसे देणे... कारण पैसा जास्त झाला ना. बोगस पैसे उचलायचे आणि या अशा गँग तयार करायच्या, या टोळ्यांना अभय द्यायचं यांच्याकडून हवी ती कामं करून घ्यायची. अशा पद्धतींचा उद्योग यांचा संपूर्ण जिल्ह्यात सुरू होता. SIT ने जे मांडलंय ते योग्य आहे. मूळ सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे आणि बाकीचे प्यादे आहेत. तीनही केसची जंत्री एकत्रित एसआयटीने केल्याचं दिसतंय. कलम 34 प्रमाणे सामूदायिक जबाबदारी सगळ्यांची आहे. म्हणजे खून करायला जरी प्रत्यक्षात त्या जागेवर वाल्मिक कराड नसला तरी वाल्मिक कराडच्याच आदेशवर खून झालाय. त्यामुळे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे. दोन नावं वगळली असं म्हटलं जात आहे. जर त्यांचा संबंध नसेल तर ती नावं वगळली असतील. त्याबद्दल आमचं काही मत नाही. परंतु आमचं जे देशमुख कुटुंब आहे आणि आम्ही जे आहोत यामध्ये जे पोलीस आहे.. महाजन आणि राजेश पाटील या लोकांचा त्यात सहभाग आहे. कदाचित पुरवणी आरोपपत्र दाखल करायची वेळ आली तर ते करावं. त्यात पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावं अशी आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे."