Walmik Karad Admitted in Hospital:वाल्मिक कराडची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली. यानंतर त्याला बीडमधील (Beed Jail) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कालच वाल्मिक कराडला न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो आता बीड जेलमध्ये होता. बीड (Beed) जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा वाल्मिकच्या पोटात दुखत असल्याची माहिती समोर आली. यानंतर काही वेळातच कडेकोट बंदोबस्तात वाल्मिक कराडला तुरूंगातून थेट बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Afghan National in Mumbai : 18 वर्षांपासून मुंबईत राहत होता अफगाणी नागरिक, कोर्टाकडून 11 महिने तुरूंगवासाची...
प्रकृती नाजूक असल्यानं वाल्मिक कराडवर (Walmik Karad) बीडच्या जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबद्दल रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख (Beed Sarpanch Santosh Deshmukh) प्रकरण आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची कोठडी काल संपली. त्यामुळे त्याला काल न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातूनच ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा >> Nitesh Rane on Saif Ali Khan : सैफ अली खानवर खरंच हल्ला झाला की फक्त अॅक्टींग? काय म्हणाले राणे?
मकोकामध्ये वाल्मिक कराडला याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती. काल ती पोलीस कोठडी संपली होती. आरोपीचे वकील अशोक कवडे कोर्टात हजर होते. तर सरकारकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे कोर्टामध्ये हजर होते. तपास अधिकारी किरण पाटील यांनी तपासाची माहिती दिली. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याची माहिती किरण पाटील यानी दिली. पोलीस कोठडीची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार 5 फेब्रुवारीपर्यंत आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या कराड बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आहे.
बीड जिल्हा कारागृहात कराडची रवानगी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
