Malik Vs Wankhede: नवाब मलिकांच्या ‘त्या’ फोटोला वानखेडे कुटुंबीयांनी दिलं फोटोनेच प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई तक

• 12:30 PM • 22 Nov 2021

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे सातत्याने नव-नवे आरोप करत आहेत. त्यातच सोमवारी (22 नोव्हेंबर) त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील एक जुना फोटो शेअर केला. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत आणि त्यांनी धर्म परिवर्तन करुन खोट्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक हे सातत्याने नव-नवे आरोप करत आहेत. त्यातच सोमवारी (22 नोव्हेंबर) त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील एक जुना फोटो शेअर केला.

हे वाचलं का?

समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत आणि त्यांनी धर्म परिवर्तन करुन खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविली असल्याचं मलिक यांचा आरोप आहे. दरम्यान, आता समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी देखील काही जुने फोटो शेअर करुन मलिकांना फोटोच्याच माध्यमातून उत्तर दिलं आहे.

वानखेडे कुटुंबीयांचं नवाब मलिकांना फोटोमधूनच उत्तर

दरम्यान, याबाबत जेव्हा ‘मुंबई Tak’ ने वानखेडेंच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे काही जुने फोटो शेअर केले.

या फोटोमध्ये समीर वानखेडे यांचे वडील दिसत आहेत. जे एका हिंदू धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर समीर वानखेडेंची आई ही एका कौटुंबिक पूजा समारंभात असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय आणखी एका फोटोमध्ये समीर वानखेडे हे स्वत: घरी पूजा करत असल्याचंही दिसत आहे.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने ‘मुंबई Tak’ सोबत बोलताना सांगितलं की, ‘आमचं कुटुंब हे एक आदर्श आणि धर्मनिरपेक्ष कुटुंब आहे. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. देशाची सेवा करणं हा देखील एक धर्मच आहे.’

‘मुंबई Tak’सोबत बोलताना वानखेडे यांच्य कुटुंबातील आणखी एका सदस्याने सांगितले की, ‘नवाब मलिक हे धर्माबाबत खालच्या पातळीवरचं राजकारण करत आहेत. आम्ही हे फोटो यासाठी फक्त प्रसिद्ध करत आहोत की, जे करुन हे समजावं की, आमच्या कुटुंबात धर्म हा कधीही मुद्दा नव्हता.’

‘कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर धर्मनिरपेक्षतेचेच संस्कार झाले आहेत. आम्हाला कधीच वाटले नव्हते की, आम्हाला आमचा धर्म आणि श्रद्धा याबाबत कोणतेही स्पष्टीकरण द्यावे लागेल. बॉलिवूडमधील अनेक घरांमध्ये देखील अशाच स्वरुपाचं वातावरण असतं. त्यामुळे आम्ही जे फोटो शेअर करत आहोत ते हेच दर्शवतात की, आमच्या घरात धर्म हा कधीच मुद्दा नव्हता.’ असं ते म्हणाले.

नवाब मलिकांनी कोणता फोटो शेअर केला?

महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्री आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन एक फोटो ट्विट केला आहे. नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करताना कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, ‘कबूल है, कबूल है, कबूल है… याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, ‘समीर दाऊद वानखेडे तुम्ही हे काय केलं?’

Nawab Malik: ‘ये क्या किया तुने समीर वानखेडे?’, नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला नवा फोटो

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती (नवाब मलिक यांचा मते ही व्यक्ती समीर वानखेडे आहे.) एका कागदावर सही करताना दिसत आहे. हा ‘निकाहनामा’ असल्याचे सांगितले जात आहे.

    follow whatsapp