बुलीबाई अॅप नक्की काय आहे? यातून का केलं जातंय मुस्लिम महिलांना टार्गेट ?

मुंबई तक

• 04:02 AM • 04 Jan 2022

बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केलं जात आहे. बुलीबाई अँप उघडल्यानंतर रँडमली मुस्लिम महिलांचे फोटो दिसत राहतात.युजर त्यातील एखादा फोटो बुली बाई अॉफ द […]

Mumbaitak
follow google news

बुली बाई नावाने गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध महिलांचे फोटो वापरुन आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात गटाकडून गिटहब अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात येत असून त्यांना टार्गेट केलं जात आहे.

हे वाचलं का?

बुलीबाई अँप उघडल्यानंतर रँडमली मुस्लिम महिलांचे फोटो दिसत राहतात.युजर त्यातील एखादा फोटो बुली बाई अॉफ द डे म्हणून सिलेक्ट करतो.

त्यानंतर त्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जातात आणि त्या फोटोवर बोली लावली जाते.मग हा फोटो Bullibai या हँशटँगने दिवसभर ट्रेंड केला जातो.सध्या ट्वीटर आणि फेसबुकवर अधिक सक्रीय असलेल्या किमान १०० महिलांना या अँपवरून लक्ष्य करण्यात आले आहे. मीडीयासह इतर क्षेत्रातील महिलांचाही त्यात समावेश आहे.

शनिवार, 1 जानेवारी 2022 रोजी बुली बाई नावाने अॅपवर फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितलं आहे

या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड केले असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार करण्यात आली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी या याप्रकरणीच गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.या अॅपमध्ये नाव असलेल्या एका मुस्लीम महिला पत्रकाराने सांगितलं की मुस्लिम महिलांसाठी नवीन वर्षाची सुरुवात भीती आणि द्वेषाच्या भावनांनी झाली आहे. गेल्या वर्षी ‘सुल्ली डील्स’ चा वाद झाला होता. यातही मुस्लीम महिलांच्या फोटोचा गैरवापर करण्यात आला होता. पण दोषींविरोधात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता अश्या अँप्सना वेळीच थांबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

    follow whatsapp