Narhari Zirwal एकनाथ शिंदेंसोबतच्या १६ आमदारांचं भवितव्य उपसभापतींच्या हातात; शिवसेनेच्या शिफारशीवर आता काय होणार?

ऋत्विक भालेकर

• 07:09 AM • 24 Jun 2022

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केले आहे. आपल्याला 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १२ आमदारांना आणि आज ४ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे. आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केले आहे. आपल्याला 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १२ आमदारांना आणि आज ४ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे. आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंच्या कालच्या पत्रावर उपाध्यक्ष झिरवाळांचे स्पष्टीकरण, म्हणाले शिंदेंकडे…

शिवसेनेने मागणी केलेल्या १६ आमदारांचे पुढे काय होणार?

* शिवसेनेने आणखी चार बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आता शिंदे गटातील एकूण 16 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

* शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर उपाध्यक्ष १६ आमदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावू शकतात, त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे.

* नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर स्पष्टीकरणासाठी १६ आमदारांची सुनावणी घेण्यात येईल.

* सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याऐवजी, कोरोनामुळे, आभासी सुनावणीची व्यवस्था विचारात घेतली जाऊ शकते आणि परवानगी दिली जाऊ शकते.

* नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) कडून उपलब्ध असलेल्या बँडविड्थनुसार, एका दिवसात 2 ते 4 आमदारांची सुनावणी घेतली जाऊ शकते.

* अर्ध-न्यायिक प्रक्रिया असेल जी वेळ घेणारी असणार आहे. यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही, परंतु विधानसभा अपात्रतेच्या याचिकेवर लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल.

ते १६ आमदार कोण?

१) संजय शिरसाट

२) अब्दुल सत्तार

३)भरत गोगावले

४) संदीप भामरे

५) महेश शिंदे

६) अनिल बाबर

७) बालाजी कल्याणकर

८) एकनाथ शिंदे

९) लता सोनावणे

१०) प्रकाश सुर्वे

११) यामिनी जाधव

१२) तानाजी सावंत

१३) रमेश बोरनारे

१४) चिमणराव पाटील

१५) संजय रायमूलकर

१६) बालाजी किणीकर

एकनाथ शिंदे कालच्या ट्विटमध्ये काय म्हणाले होते?

कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

    follow whatsapp