आमदार गुंडगिरी करत आहेत, धमक्या देत आहेत. खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. खरे मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही. तुम्हीच सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहे? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या विरोधी गटात सहभागी झाले. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसंच सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी काय म्हटलं आहे?
५० खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. त्यामध्ये आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. सत्ताधारी बाकावर शिवसेना नाही ते गद्दार आहेत असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आले रे आले गद्दार आले अशा घोषणाही देण्यात आल्या. सत्ताधारी बाकांवर गद्दार बसले आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमचाच व्हीप अधिकृत राहणार. आम्ही घटनेच्या नुसार काम करतो आहोत असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यालय कुणाच्या ताब्यात राहणार किंवा काय या छोट्या गोष्टी आहेत. मात्र या सरकारला कुणाचंही काही पडलेलं नाही.
या सरकारला सत्तेचा माज आला आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं
हे सरकार बदल्याचं आणि स्थगितीचं झालं आहे. या सरकारला अवघ्या एक दीड महिन्यातच सत्तेचा माज चढला आहे. स्वतःला काय मिळेल यावरच हे नेते नाराज झाले आहेत. आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळाली आहेत असं यांना वाटतं आहे. आमच्याकडे असताना जी मंत्रिपदं मिळाली तीच अनेकांना मिळाली. डाऊनरेट मंत्री झाले आहेत. एवढंच नाही तर खरे मुख्यमंत्री कोण तेच कळत नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले आणि एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली.
ADVERTISEMENT
