मुश्रीफांच्या मालमत्तांवर ED च्या धाडी, किरीट सोमय्यांचे आरोप काय?

भागवत हिरेकर

11 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

ed raided at hasan mushrif’s properties update : अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सुटकेमुळे आनंदीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (nationalist congress party) चिंतेत भर पडलीये. राष्ट्रवादीच्या (NCP) कोल्हापुरातील (kolhapur) मोठ्या नेत्याविरुद्ध ईडीने कारवाई सुरू केलीये. प्रकरण आहे आर्थिक गैरव्यवहारांचं (Money Laundering) आणि नेते आहेत हसन मुश्रीफ (hasan Mushrif). हसन मुश्रीफांच्या घर आणि मालमत्तांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर सगळ्यांना […]

Mumbaitak
follow google news

ed raided at hasan mushrif’s properties update : अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सुटकेमुळे आनंदीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (nationalist congress party) चिंतेत भर पडलीये. राष्ट्रवादीच्या (NCP) कोल्हापुरातील (kolhapur) मोठ्या नेत्याविरुद्ध ईडीने कारवाई सुरू केलीये. प्रकरण आहे आर्थिक गैरव्यवहारांचं (Money Laundering) आणि नेते आहेत हसन मुश्रीफ (hasan Mushrif). हसन मुश्रीफांच्या घर आणि मालमत्तांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडलाय की, प्रकरण नेमकं काय? तेच आपण समजून घेऊ…

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरासह इतर ठिकाणच्या मालमत्ता आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले. बुधवारी सकाळी हे छापा सत्र सुरू झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण, हे छापा सत्र ज्या प्रकरणामुळे सुरू झालं, त्याची सुरूवात 2021 मध्ये झालीये.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट आणि शिंदे गट) पक्षातील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप सुरू केले होते. त्यातच एक नाव होतं हसन मुश्रीफांचं. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केले आणि आयकर विभागाकडे तक्रारही केली. त्यानंतर या प्रकरणाची ईडी आणि आयकरकडून चौकशी सुरू झालीये.

Hasan Mushrif Money laundering case : किरीट सोमय्या यांचे आरोप काय आहेत?

सोमय्यांच्या दाव्याप्रमाणे, ‘हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबाने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग केलं. बेनामी संपत्ती विकत घेतली. याचे माझ्याकडे 2700 पानी पुरावे आहेत. सीआरएम सिस्टम प्रा. लि., प्रविण अग्रवाल म्हणून हिचा ऑपरेटर आहे. या कंपनीमधून हसन मुश्रीफांच्या मुलाने दोन कोटींचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे.

सोमय्यांनी असाही दावा केलेला आहे की, ‘सीआरएम सिस्टीम ही शेल कंपनी आहे. तिच्यावर बंदी घातली गेलेली आहे. या कंपनीतील लोकांवर कारवाई सुरू आहे. नावीत मुश्रीफ यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे दाखवलेलं आहे की, त्यात त्यांनी 2 कोटी 45 लाख 354 रुपये रक्कम दाखवलेली आहे. सीआरएम सिस्टीम ही कंपनी शेल कंपनी असल्याचं रिझर्व्ह बँकेसह इतरांनी म्हटलेलं आहे.’

“मुश्रीफांनी फेक कंपन्याच्या माध्यमातून उत्पन्न दाखवलं”

सोमय्यांनी मुश्रीफांवर हाही आरोप केलेला आहे की, ”मरुभूमी फायनान्सकडून 15.90 कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सीकडून 35.62 कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपीकडून 4.49 कोटी, नवरत्न असोसिएशट्सकडून 4.89 कोटी, रजत कंझ्युमर्स सर्विसेसकडून 11.85 कोटी, माऊंट कॅपिटलकडून 2.89 कोटी मिळाले आहेत. फेक कंपन्यांच्या माध्यमातून उत्त्पन दाखवून त्या नावे उघडलेल्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार झाले असल्याचं दाखवलं आहे.

‘माझ्याकडे 127 कोटी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे आहेत. यात हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, त्यात त्यांची पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या खात्यात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 3 लाख 78 हजार 340 रुपयांचे समभाग दाखवले आहेत.

सोमय्यांनी असाही आरोप केलेला आहे की, ‘2018-19 मध्ये आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यातून बरीच माहिती समोर आली. ती माहिती दाबण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात 127 कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचं पुराव्यानिशी समोर आलेलं आहे. मुश्रीफ कुटुंबाने सरसेनापती संताजी धनाजी कारखान्यात १०० कोटीहून अधिक भ्रष्टाचार केला आहे. हसन मुश्रीफ, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांचे आर्थिक व्यवहार आणि पारदर्शकता नसलेल्या उत्पन्नाबाबतची, तसेच हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाला 100 कोटी रुपये कुठून मिळाले? याची चौकशी केली जावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी आरोप करताना केली होती.

‘नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी M/s CRM Systems Pvt Ltd कडून 2 कोटी आणि मेसर्स मारुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीकडून 3.85 कोटी कर्ज घेतले आहे. पण या दोन्ही कोलकात्यातील शेल कंपनी आहेत. या कंपन्यांचे संचालक सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर आणि गोपाल पोवार हे आहेत. जे हसन मुश्रीफ यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड कोल्हापूरमध्ये आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंग झालेलं आहे,’ असं सोमय्यांचं म्हणणं आहे.

    follow whatsapp