Aditya Thackeray : लादेनसारखा याकूब मेमनचा मृतदेह समुद्रात दफन का केला नाही?

ऋत्विक भालेकर

08 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:47 AM)

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर लाईट लावले गेले आहेत आणि संगमरवर लावून कबरीची मजार करण्यात आली आहे असा आरोप भाजपकडून केला जातो आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही रंगल्या आहेत. भाजपने या प्रकरणी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत हेच का तुमचं मुंबईवरचं आणि देशावरचं प्रेम असा प्रश्न विचारला आहे. अशात आता या प्रकरणात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची […]

Mumbaitak
follow google news

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवर लाईट लावले गेले आहेत आणि संगमरवर लावून कबरीची मजार करण्यात आली आहे असा आरोप भाजपकडून केला जातो आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही रंगल्या आहेत. भाजपने या प्रकरणी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत हेच का तुमचं मुंबईवरचं आणि देशावरचं प्रेम असा प्रश्न विचारला आहे. अशात आता या प्रकरणात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आदित्य ठाकरे यांनी याकूब मेमनच्या कबरीवरच्या आरोपांबाबत?

याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण केलं जाणं हे कितपत योग्य आहे? जेव्हा याकूब मेमनला फाशी देण्यात आली तेव्हा त्याचा मृतदेह कुटुंबाला का देण्यात आला? तेव्हा सरकार कुणाचं होतं? याकूब मेमनच्या मृतदेहावर मान-सन्मानात अंत्यसंस्कार का झाले? हे प्रश्नही उपस्थित होतात असं आदित्य ठाकरे यांनी विचारलं आहे. एवढंच नाही तर ओसामा बिन लादेनच्या मृतदेहासारखा याकूबचा मृतदेह समुद्रात का दफन केला नाही? मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने हे आरोप होत आहेत. असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण?

याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.

याकूबच्या कबरीवरून राजकारण काय रंगलं आहे?

याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण असं रंगलं आहे की भाजपने आता थेट या प्रकरणी आधीच्या सरकारवर म्हणजेच ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. याकूबच्या कबरीला मजारचं स्वरूप आलं आहे. मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूब मेमनच्या कबरीला मजारचं स्वरूप येणं ही बाब दुर्दैवी आहे या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी काय म्हटलं आहे?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या काळात मुंबईत पाकिस्तानच्या इशाऱ्यावर १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीला आता मजारचं स्वरूप आलं आहे. हेच का उद्धव ठाकरेंचं मुंबई प्रेम? हीच का यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी या सगळ्यांनी याबाबत माफी मागावी.

    follow whatsapp