स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार?; नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

मुंबई तक

• 08:22 AM • 18 Sep 2022

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी नाशिक: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचे आज नाशिक दौऱ्यावरती होते. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयावरती भाष्य केले. यावेळी नाना पटोले म्हणाले ”आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, परंतु कार्यकर्त्यांची मतं महत्वाची आहेत”. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळाचा नारा देणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील सरकार […]

Mumbaitak
follow google news

प्रविण ठाकरे, प्रतिनिधी

हे वाचलं का?

नाशिक: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचे आज नाशिक दौऱ्यावरती होते. तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयावरती भाष्य केले. यावेळी नाना पटोले म्हणाले ”आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, परंतु कार्यकर्त्यांची मतं महत्वाची आहेत”. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळाचा नारा देणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील सरकार देवालाही घाबरत नाही- नाना पटोले

महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवली आहे. बांठिया रिपोर्ट आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट मत नानांनी व्यक्त केलं आहे. ”राज्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यांना देवाची पण भिती राहिली नाही. अनंत चतुर्दशीला घोषणा करतात पण अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

वेदांता प्रकल्पावरुन काय म्हणाले नाना पटोले?

राज्यातले वेदांतासारखे उद्योग बाहेर चालले आहेत. राज्यातील ईडी सरकारने हे गुजरातला पाठवले. महाराष्ट्राची लुट करून गुजरातला पाठवत आहेत. 2014 ते 2019 ला जेव्हा स्वतः फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमचे पाणी गुजरातला पळवले होते. आता वेदाता यांच्या काळातच गेला अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. राज्यातील सरकार लोकशाही विरोधी असल्याचंही नाना पटोले म्हणाले. मोदींच्या ओबीसी असल्याबाबत AICC चे महासचिव शक्तीशील गोईल यांच्याकडे मोदींबाबतचे सर्व पुरावे आहेत ते सादर करतील असंही पटोले म्हणाले आहेत.

दसरा मेळावा वादात आम्हाला पडायचे नाही.

एकनाथ शिंदे गटाला मेळावा घेण्यासाठी बिकेसी मैदानावरती परवानगी मिळाली आहे. आता उद्धव ठाकरे कुठे मेळावा घेणार याबाबत स्पष्टता नाही. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे लागण्याचे आदेश दिलेत खरे पण मेळावा कुठे होणार याबाबत स्पष्टता नाही. याबाबत नाना पटोले म्हणाले ”दसरा मेळावा वादात आम्हाला पडायचे नाही.”

    follow whatsapp