गळ्यात साखळी बांधून ठेवले शरीरसंबंध त्यानंतर महिलेने प्रियकराचं मुंडकं छाटलं

एका महिलेने शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. आधी या महिलेने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. त्यावेळी या महिलेने प्रियकराच्या गळ्यात चेन अडकवली होती. शरीरसंबंध ठेवल्यानंतर या महिलेने याच साखळीने प्रियकराचा गळा आवळला त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांचं मुंडकं छाटून बादलीत ठेवलं. एवढ्यावरच ही बाई थांबली नाही तर तिने तिच्या प्रियकराच्या मृतदेहाचे […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 02:54 PM • 02 Mar 2022

follow google news

एका महिलेने शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तिच्या प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. आधी या महिलेने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. त्यावेळी या महिलेने प्रियकराच्या गळ्यात चेन अडकवली होती. शरीरसंबंध ठेवल्यानंतर या महिलेने याच साखळीने प्रियकराचा गळा आवळला त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांचं मुंडकं छाटून बादलीत ठेवलं. एवढ्यावरच ही बाई थांबली नाही तर तिने तिच्या प्रियकराच्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी लपवले.

हे वाचलं का?

ही घटना अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन मध्ये घडली आहे. ग्रीन ब्रे शहरातल्या या 24 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी महिलेचं नाव टेरल एस असं आहे. या महिलेवर जाणीवपूर्वक हत्या करणं, मृतदेह अत्यंत वाईट पद्धतीने नष्ट करणं, थर्ड डिग्री आणि लैंगिक छळ याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या महिलेने आणि तिच्या प्रियकराने ड्रग्ज घेतल्याचंही समोर आलं आहे. आज तकने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

क्रौर्याचा कळस! लग्नाला नकार दिल्याने तरूणीवर बलात्कार, मुंडकं धडावेगळं करत केली हत्या

पोलिसांना टेलरच्या प्रियकराच्या मृतदेहाचे वेगवेगळे तुकडे ग्रीन बे मधल्याच एका घरात सापडले आहेत. पोलिसांनी हे देखील म्हटलं आहे की ज्याची हत्या करण्यात आली तो कायमच या महिलेसोबत असायचा. पहिल्यांदा जेव्हा या महिलेला पोलिसांनी पाहिलं तेव्हा तिच्या कपड्यांवर आणि हातांवर रक्ताचे डाग होते. त्यानंतर आम्हाला जी तक्रार मिळाली होती त्यानुसार आम्ही टेलरच्या कारचीही झडती घेतली. ज्यामध्ये आम्हाला तिच्या प्रियकराचा पाय आणि शरीराचे दुसरे भागही मिळाले.

ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ

ज्या ठिकाणी ही भयंकर आणि अत्यंत क्रूर अशी घटना घडली त्या ठिकाणी ड्रग्ज आणि रक्त साफ केलं गेल्याचे पुरावे आढळले आहेत. पोलिसांनी विचारलं की हे तू काय केलं आहेस ? त्यावर टेलर म्हणाली की तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. टेलरने पोलिसांना हे देखील सांगितलं की ती नशेत होती. पोलिसांना हे वाटतं आहे की या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मेथामफेटामाइन नावाचं ड्रग्ज घेतलं होतं. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला साखळीने बांधलं. त्यानंतर दोघांनी शरीर संबंध ठेवले. त्यानंतर नशेचा खूप अंमल चढलेल्या या महिलेने तिच्या पार्टनरची काही कारणाने हत्या केली. ही हत्या तिने नेमकी का केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.