लग्नाच्या 6 दिवसांनंतर नवरीची हत्या, दुर्गंधीमुळे प्रकरण उघडकीस!

मुंबई तक

• 06:33 AM • 31 May 2026

Crime News : लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांनंतर एका पतीने आपल्या 24 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. मृतदेह बेडमध्ये लपवून आरोपी फरार झाला होता, मात्र दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

लग्नाच्या 6 दिवसांनंतर नवरीची हत्या

point

दुर्गंधीमुळे प्रकरण उघडकीस!

Crime News : दिल्लीतील नबी करीम भागात एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका तरुणीची तिच्याच पतीने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. मोहम्मद एजाज असे आरोपी पतीचे नाव असून, तो बिहारमधील वैशाली जिल्ह्याचा रहिवासी आहे. 26 एप्रिल रोजी एजाजचे हल्द्वानी येथील 24 वर्षीय निशा परवीन हिच्याशी लग्न झाले होते. दोघेही लक्ष्मणपुरी येथील एका भाड्याच्या घरात राहत होते आणि जवळच असलेल्या एका बॅग फॅक्टरीमध्ये एकत्र काम करत होते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि 2 मे रोजी एजाजने निशाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने निशाचा मृतदेह चक्क बेडच्या आत लपवून ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून तो पसार झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : दुष्काळात तेरावा महिना, पुणेकरांच्या खिशाला कात्री, 'एवढ्या' रुपयांनी महागला CNG

दुर्गंधीमुळे उघडकीस आले प्रकरण; पोलीस तपासात गुन्ह्याची कबुली

बेडमध्ये लपवलेला मृतदेह कुजल्यामुळे खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. सुरुवातीला आजूबाजूच्या रहिवाशांना एखादा प्राणी मरण पावला असावा असे वाटले, परंतु शनिवारी दुर्गंधी असह्य झाली आणि एजाज अनेक दिवसांपासून दिसून आला नाही, तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली असता, बंद खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बेडची पाहणी केली असता, त्यात निशाचा सडलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी तातडीने निशाचे वडील मोहम्मद हसन यांना माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसांनी हुंडाबळीची कलमे लावून गुन्हा दाखल केला आणि फरार एजाजचा शोध सुरू केला. एसएचओ गुलशन नागपाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रविवारी आरोपी एजाजला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच, आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड