woman sub inspector alleges rape by father in law : एका महिला उपनिरीक्षकाने आपल्याच सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या गंभीर तक्रारीने संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. महिला उपनिरीक्षकाने तिचा सासरा, पती, सासू आणि नणंदेवर अत्यंत भयानक आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींकडून तिला सातत्याने जातवाचक शब्द वापरून मानसिक आणि शारीरिक छळ दिला जात होता. तसेच तिला तिच्या पोलीस दलातील नोकरी सोडण्यासाठी वारंवार भाग पाडले जात होते. या साऱ्या प्रकरणाची तक्रार चार दिवसांपूर्वी पोलिसांकडे करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. आता या प्रकरणाने जोर धरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!
सासरच्या मंडळींनी गाठली क्रूरतेची सीमा
पीडित महिला मूळची लखनौमधील रहिवासी असून तिचे शुभम सिंह या तरुणाशी 14 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न झाले होते. हे एक आंतरजातीय विवाह (इंटर-कास्ट मॅरेज) असल्याने सासरच्या मंडळींचा तिला लग्नानंतरपासूनच तीव्र विरोध होता. तक्रारीनुसार, तिला आपल्या सासरी अनेक वेळा अपमानित केले गेले. महिला उपनिरीक्षकाने नोकरी सोडण्यास विरोध केल्यामुळे तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि पतीने क्रूरतेची सीमा गाठली. सासऱ्याने चक्क त्यांच्याकडील परवानाधारक बंदुकीच्या धाकावर सून असलेल्या महिला उपनिरीक्षकावर बलात्कार केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप तिने केला आहे. ही सर्व आपबीती तिने आपल्या पतीला सांगितल्यावर त्याने तिला साथ देण्याऐवजी, उलट तिलाच धमकावून हे सर्व प्रकरण दाबून टाकण्यास आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले.
हेही वाचा : बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच, सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं; दोषी कोण?
सासरच्या मंडळींनी मिळून दिले उंदीर मारण्याचे औषध
या अत्याचार प्रकरणाची साखळी इथवरच थांबली नाही, तर 19 जानेवारी 2026 रोजी तिच्या पतीने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, ज्याला तिने कडाडून विरोध केला. या विरोधामुळे संतप्त झालेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी मिळून तिला चक्क उंदर मारण्याचे विष बळजबरीने खाऊ घातले आणि एका खोलीत बंद केले. तिने प्रसंगावधान राखून आपल्या वडिलांना फोन केला, त्यानंतर त्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून तिला गंभीर अवस्थेत लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे उपचारानंतर ती थोडक्यात बचावली. इतकेच नाही तर, तिच्या वडिलांवरही सासरच्या मंडळींनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता, तर 25 मे रोजी पतीने चक्क तिच्यावर गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला, ज्यातून ती छतावरून उडी मारून जीव वाचवण्यात यशस्वी झाली.
पीडितेने या संपूर्ण अत्याचाराची माहिती लखनौच्या पारा पोलीस ठाण्यात चार दिवसांपूर्वीच दिली होती, परंतु सुरुवातीला पोलिसांनी काहीही हालचाल केली नाही. अखेर DCP कमलेश दीक्षित यांनी या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आता सर्व आरोपींचा शोध घेत असून कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. ही संपूर्ण धक्कादायक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील बख्शी का तालाब परिसरातील पारा पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT











