एकनाथ शिंदेंनी बंडानंतर थेट शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीलाच हात घातला. मोठ्या गटाच्या पाठिंब्यावर शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता म्हणून जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाची नजर वळलीये ती, शिवसेनेशी सलग्नित युवा सेनेकडे! युवा सेना ताब्यात घेण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झाले असून, आता युवा सेना कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आलीये. पण ठाकरेंच्या काळात असलेली घराणेशाही शिंदे गटाकडून कायम ठेवली गेल्याचंच दिसतंय.
ADVERTISEMENT
खरी शिवसेना कुणाची हा वाद आता सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या कोर्टात पोहोचलाय. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेबरोबरच युवा सेनेवर कब्जा मिळवण्यासाठी नवा डाव टाकलाय. शिवसेना पक्षावर हक्क सांगितल्यावर शिंदेंनी त्यांचा मोर्चा वळवला आहे तो शिवसेनेच्या इतर संघटनांवर… यातली सगळ्यात महत्वाची संघटना आहे ती युवासेना!
आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवा सेना स्वतःकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड केलं. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर युवा सेनेतही बंडाचे पडसाद उमटले. युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला.
एकनाथ शिंदेंसोबत वाद झाल्याची बातमी पेरली गेली?; प्रताप सरनाईकांचं रोखठोक उत्तर
एकेकाळचे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जाणार पदाधिकारी राज कुलकर्णी, रुपेश पाटील हे आता शिंदे गटात आले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते असणारे किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेत युवा सेनेची नवी कार्यकारणी घोषित केली आहे. पण शिंदेंच्या सेनेने घोषीत केलेल्या या नवी कार्यकारणीत सर्वसामान्य तरुणांपेक्षा आमदारांच्या चिरंजींवांचीच वर्णी लागल्याचे दिसून येतंय.
Shiv Sena fight : एकनाथ शिंदेच पक्षप्रमुख! शिंदे गटाने पहिल्यांदाच मांडली स्पष्ट भूमिका
शिंदे गटाकडून युवा सेना कार्यकारिणीत कुणाच्या करण्यात आल्या नियुक्त्या?
अविष्कार भुसे, अभिमन्यू खोतकर, विकास गोगावले, दीपेश म्हात्रे, समाधान सरवणकर, राज सुर्वे, प्रयाग लांडे हे सगळेच नवनियुक्त सदस्य हे अनुक्रमे कॅबिनेट मंत्री दादा भुसे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार दिलीप लांडे या बडया नेत्यांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे शिंदेंच्या युवा सेना कार्यकारिणीतही घराणेशाहीलाच प्राधान्य देण्यात आल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटण्यास सुरूवात झालीये.
युवा सेना कार्यकारणी सदस्य
उत्तर महाराष्ट्र :अविष्कार भुसे
मराठवाडा : अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील
कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र : किरण साली, सचिन बांगर
कल्याण भिवंडी : दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई व पालघर :
नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे
मुंबई : समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ : ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील
ADVERTISEMENT
