Maratha Reservation: ’11 मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गोल-गोल फिरवलं’

मिथिलेश गुप्ता

• 02:06 PM • 02 Nov 2023

MNS Raju Patil: 11 मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिशाभूल केली. अशी थेट टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. पाहा राजू पाटील नेमकं काय म्हणाले

11 chief minister misled about reservation for maratha community criticism of mns mla raju patil

11 chief minister misled about reservation for maratha community criticism of mns mla raju patil

follow google news

Maratha Reservation: डोंबिवली: मराठा समाजाचे 11 मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत यांनी गोल-गोल फिरवलं. आता सत्य परिस्थिती जनतेसमोर आली आहे. या सरकारने आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मध्यम मार्ग काढायला हवा. खरी परिस्थती समाजाला सांगणे आवश्यक आहे.’ अशी टीका मनसे (MNS) आमदार प्रमोद ( राजू ) पाटील (Raju Patil) यांनी केली आहे. (11 chief minister misled about reservation for maratha community criticism of mns mla raju patil)

हे वाचलं का?

गुरुवारी डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून इंदिरा चौकात साखळी उपोषण सुरू केले. यावेळी मनसे आमदार पाटील यांनी या ठिकाणी मराठा बांधवांची भेट घेतली.

पाहा राजू पाटील नेमकं काय म्हणाले?

मनसे आमदार राजू पाटील यावेळी म्हणाले की, ‘मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला मनसेचा पाठिंबा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. बुधवारी सहयाद्री येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने खरी वस्तुस्थिती सांगितली. या सरकारने मनोज जरांगे पाटील व मराठा बांधवांना याची माहिती देणे आवश्यक आहे.’

हे ही वाचा>> Maratha Reservation : मराठा आंदोलनात केतकी चितळेची उडी, व्हिडिओ केला शेअर; म्हणाली…

‘सुरुवातीपासून मनसेचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. शिस्तबद्ध मोर्चे निघाले होते तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्तुती केली होती. त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

काही गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत. त्यासाठी खर तर सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगणे गरजेचे आहे, जेणेकरून हे सर्व टाळता आले असते. अजूनही सरकार लवकरच होईल, थोडं वेळ द्या असे सांगताय. यासाठी नेमकी यात प्रक्रिया काय आहे हे समाजाला सांगणे आवश्यक आहे. उपोषण सोडा असे सरकारने जरांगेना सांगायला हवे. मराठा समाजाचे 11 मुख्यमंत्री झाले पण यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जनतेला गोल गोल फिरविले.

हे ही वाचा>> कुणबी प्रमाणपत्र आणि OBC आरक्षण, जरांगे-पाटलांची नेमकी मागणी काय? जाणून घ्या 10 प्रश्नांची उत्तरं

गृहमंत्री फडणवीस यांनी हिंसक आंदोलन करणाऱ्या गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले आहे. यावर पत्रकारांनी मनसे आमदार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, आंदोलनाला वेगळी दिशा देणाऱ्याबाबत पोलिसांच्या गुप्तखात्याने शोध घेतला पाहिजे.

    follow whatsapp