रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून रान पेटलं, काँग्रेस नेत्यासह आंदोलकांचा संताप, म्हणाले 'तुझा बाप जरी आला तरी...'

Ravindra Chavan Statement : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केलं होतं.

Ravindra Chavan Statement

Ravindra Chavan Statement

मुंबई तक

07 Jan 2026 (अपडेटेड: 07 Jan 2026, 08:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

विलासराव देशमुखांवरून केलेल्या वक्तव्यावरून संतापाची लाट

point

'एखादा माणूस हयात नसतानाच त्याच्याबाबत बोलणं..'

Ravindra Chavan Statement Over Vilasrao Deshmukh : सकलेन मुलाणी - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरात रान पेटलं होतं. काँग्रेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच टीकेची तोफ डागली होती. अशातच आता कराडमध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'पप्पा माझे पीरियड्स सुरु आहेत..', निष्पाप मुलीची बापाकडे विनवनी; पण शेवटी पदरी नरकयातना

विलासराव देशमुखांवरून केलेल्या वक्तव्यावरून संतापाची लाट

काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'विलासराव देशमुख अमर रहे', 'रवींद्र चव्हाण मुर्दाबाद,' भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. विलासराव देशमुखांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून परिसरात संतापाची लाट पसरल्याचं चित्र होतं. याच आंदोलनात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव चिखलीकर यांनी रवींद्र चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला होता.

अजित चिखलीकर काय म्हणाले? 

अजित चिखलीकर म्हणाले होते की, 'तुझा बाप वरून आला, अण्णाजी पंतांचे वडील आले तरी विलासराव देशमुख यांच्या खुणा कोणीही पुसू शकणार नाही. देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली विलासरावांचे नेतृत्व घडले आणि त्यांनी महाराष्ट्र राज्याला सर्वसमावेश दिशा दिली होती'.

'एखादा माणूस हयात नसतानाच त्याच्याबाबत बोलणं..'

'मराठवाड्यापासून संपूर्ण राज्याचा विकास त्यांच्या प्रकल्पातून उभा राहिला. एखादा माणूस हयात नसतानाच त्याच्याबाबत बोलणं म्हणजे हे पाप असतं... पण या लोकांना समज कधी येणार? आमचे आमदार स्वत: विलासरावांचे जावई आहेत, त्यांच्यात खरंच काही असेल तर त्यांनी पुढं यावं आणि याचा निषेध करावा. नावं घेऊन मतांची मागणी करता, पण आता अध्यक्षांचा जाहीर निषेध करा... हे माझं त्यांना नम्र आवाहन,' असल्याचं ते म्हणाले.

हे ही वाचा : अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का? देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यामुळे हर्षवर्धन सपकाळ संतापले

नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण? 

लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच मेळाव्यातील उपस्थितांचा उत्साह पाहून रवींद्र चव्हाण म्हणाले की, "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं त्यांनी वक्तव्य केलं.

    follow whatsapp