काँग्रेस-भाजप महिला कार्यकर्त्या भिडल्या, पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा भाजप महिला कार्यकर्त्याचा आरोप

Kolhapur News : महापालिका निवडणुकीपूर्वीच एका महिलेला पोलिसांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप भाजप महिला कार्यकर्त्याने केला आहे. ही घटना राजकीय वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुजाता हंडी नावाच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी हुबळीतील केशवपूर पोलिसांवर गंभीर आरोप केला.

Kolhapur News

Kolhapur News

मुंबई तक

07 Jan 2026 (अपडेटेड: 07 Jan 2026, 09:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजकीय वादातून काँग्रेस-भाजप महिला भिडल्या

point

पोलिसांनी विवस्त्र करून मारहाण केल्याचा भाजप महिलेचा आरोप

Kolhapur News : राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सुरुच असतात. हे आरोप प्रत्यारोप अधिककरून प्रचारात बघायला मिळतात. अशातच महापालिका निवडणुकीपूर्वीच एका महिलेला पोलिसांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप भाजप महिला कार्यकर्त्याने केला आहे. ही घटना राजकीय वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. सुजाता हंडी नावाच्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी हुबळीतील केशवपूर पोलिसांवर गंभीर आरोप केला. मात्र, संबंधित महिलेनं स्वत:च कपडे फाडून गोंधळ घातल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून रान पेटलं, काँग्रेस नेत्यासह आंदोलकांचा संताप, म्हणाले 'तुझा बाप जरी आला तरी...'

काँग्रेस आणि भाजपमधील कार्यकर्त्यांचा वाद शिगेला

हुबळीमधील चालुक्यनगर भागात निवडणूक मतदान यादीवरून काँग्रेस आणि भाजपमधील कार्यकर्त्यांचा वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं. दोन्ही बाजूने कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसेच तेव्हा सुवर्णा कलकुंटला या काँग्रेस नगरसेविकेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुजाता हंडी आणि अन्य काही महिलांना आपल्या ताब्यात घेतलं. तेव्हा पोलिसांचा काही महिला कार्यकर्त्यांसह वाद झाल्याचं चित्र होतं, तेव्हा सुजाता हंडी या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी विवस्त्र करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का? देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यामुळे हर्षवर्धन सपकाळ संतापले

'महिलेनं स्वत:चे कपडे'

संबंधित प्रकरणात हुबळी पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, भाजप महिला कार्यकर्त्या सुजाता हंडी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीतून जात असतानाच स्वत:चे कपडे फाडले असा खुलासा केला. महिला विवस्त्र अवस्थेत असल्याचा व्हिडिओ तिच्याच बहिणीने काढला असल्याचं स्पष्टीकरण देखील पोलिसांनी दिलं. या प्रकरणावरून सध्या वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. याचवरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत वाढ होऊ लागली आहे.

    follow whatsapp