मुंबई महापालिकेत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार का? एकनाथ शिंदेंचं उत्तर ऐकून भुवया उंचावल्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : "आज लोकं उबाठा सोडून माझ्याकडे का येत आहेत? उद्धवजींना सोडून माझ्याकडे का येत आहेत? याचं कारण काय? सगळेच वाईट आहेत का? सगळाच कचरा आहे काय? लोकांना पाठिशी उभारणारा पाठिराखा लागतो. त्यांच्या संकटात धावून जाणारा कार्यकर्ता लागतो, तो त्यांनी माझ्यामध्ये बघितलाय. लोकं सोडून जातेत, त्यांनी आत्मपरिक्षण करावं"

eknath shinde on uddhav thackeray

eknath shinde on uddhav thackeray

मुंबई तक

08 Jan 2026 (अपडेटेड: 08 Jan 2026, 09:51 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार का?

point

एकनाथ शिंदेंचं उत्तर ऐकून भुवया उंचावल्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray, Satara : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकि‍र्दीत अनेक संकटं आली. पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील त्यांच्याकडे राहिलं नाही. अजूनही मूळ शिवसेना आमची आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 जागा जिंकल्या. मात्र, शिंदेंची शिवसेना देखील मागे राहिली नव्हती. शिंदेंच्या शिवसेनेने देखील 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र, नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. उद्धव ठाकरेंना केवळ 20 जागा मिळाल्या आणि महायुती मोठ्या सदस्य संख्येसह सत्तेत आली. त्यामुळे ठाकरेंच्या राजकारणाला तगडा झटका बसला. दरम्यान, आता मुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई असल्याचं राजकीय विश्वलेषकांकडून बोललं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरे जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर त्यांचं राजकारण संपणार अशा चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळाली. दरम्यान, बोल भिडूला दिलेल्या एकनाथ शिंदे यांनी याबाबत भाष्य केलंय.

हे वाचलं का?

लोक उद्धवजींना सोडून माझ्याकडे का येत आहेत? : एकनाथ शिंदे 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार का? मग एकनाथ शिदेंचं काय होणार? असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "मी एवढा मोठा नाही की, कोणाला संपवण्याची भाषा करु शकतो. जर तुम्ही लोकांचं कामच केलं नाही तर.. आज लोकं उबाठा सोडून माझ्याकडे का येत आहेत? उद्धवजींना सोडून माझ्याकडे का येत आहेत? याचं कारण काय? सगळेच वाईट आहेत का? सगळाच कचरा आहे काय? लोकांना पाठिशी उभारणारा पाठिराखा लागतो. त्यांच्या संकटात धावून जाणारा कार्यकर्ता लागतो, तो त्यांनी माझ्यामध्ये बघितलाय. लोकं सोडून जातेत, त्यांनी आत्मपरिक्षण करावं.

"राजकारणात कोणताही पक्ष कायमचा संपत नसतो"

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असं बोललं जातं मग एकनाथ शिंदेंचं काय होणार? याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, राजकारणामध्ये कोणताही पक्ष असला तरी तो कायमचा संपत नसतो. चढ उतार येत असतात. काँग्रेसला देखील आपण पाहिलेलं आहे. मात्र, जेव्हा सत्ता मिळते, तेव्हा ती लोकांसाठी वापरली पाहिजे. काँग्रेसच्या काळात आपण किती घोटाळे बघितले? टूजी स्पेक्ट्रम, कॉमन वेल्थ.. चारा घोटाळा.. कोळसा घोटाळा, कोलगेट घोटाळा.. मग त्यावेळेस लोकांनी ठरवलं की, सरकार बदलायला पाहिजे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. गेल्या 10-11 वर्षांच्या कालावधीत मोदीजींनी लोकांसाठी काम केलं. महाराष्ट्राचं काय ..ती देखील तशीच परिस्थिती आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

50 खोके म्हणजे काय? राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, 40 आमदार म्हणजे..., सामनाच्या मुलाखतीत गणित मांडलं

    follow whatsapp