Ajit Pawar apologized in a public meeting due to That statement about Yashwantrao Chavan : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य केले, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं होतं. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी जाहीरपणे माफी मागत हिंदी स्वराज्याची स्थापना यशवंतरावांनी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे स्पष्ट केले. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आज जालना जिल्ह्यातील परतूर शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई: डिलीव्हरी बॉय महिलेच्या घरी गेला आणि पाहता क्षणीच प्रेमात पडला, नंतर रिफंडच्या बहाण्याने मॅसेज अन्...
अजित पवार काय म्हणाले होते?
अनावधानाने झालेली चूक अजित पवार यांनी लगेच केली दुरुस्त
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या काळात 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचे राज्य केले, असं अजित पवार म्हणाले. पण त्यानंतर आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफी मागत आपली चूक झाल्याचे मान्य करत आपली चूक सुधारली. काही वेळापूर्वी बोलताना मी चुकून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याचे विधान केले. मला माफ करा, असं म्हणत त्या विधानावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असं म्हणत अनावधानाने झालेली चूक अजित पवार यांनी लगेच दुरुस्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT











